शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शिक्षण-आरोग्यवर वादळी चर्चा

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

स्थायी समिती सभा : उपायुक्तांना चौकशी आदेश; सदस्य आक्रमक

सांगली : महापालिकेचे प्राथमिक शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समिती नियुक्तीचा प्रस्ताव दडपल्याप्रकरणी गुरुवारी स्थायी समिती सभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभापती संजय मेंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दोन दिवसात विषयपत्र सादर करा, असे आदेश प्रशासनाला दिले.नगरसेवक विजय घाडगे यांनी शिक्षण मंडळ बरखास्त होऊन वर्ष झाले, आयुक्तांनी जानेवारीतच शिक्षण समिती नियुक्त करण्याच्या फाईलीवर स्वाक्षरी केली होती. शिक्षण मंडळ प्रशासनाने ही फाईलच दडपली आहे. सध्या मंडळाचा बेकायदेशीर कारभार सुरू असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर सभापती मेंढे यांनी दोन दिवसात शिक्षण समितीचा प्रस्ताव तयार करुन महासभेपुढे विषयपत्र द्या, असे आदेश दिले. स्वच्छता, कचरा उठाव, औषध फवारणी यावरुन सुरेश आवटी, विष्णू माने, दिलीप पाटील आदींनी आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातल्या बिल्डर लॉबीला एनओसीचे दाखले देण्याचे काम स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर, आर. के. यादव हे करतात, जागेवर जाऊन पाहणी न करता ना हरकत दाखले देण्याचे काम हे लोक करतात, स्वच्छता निरीक्षकांना एनओसीचे अधिकार हे या दोघांनी आपल्याकडेच ठेवले, असा आरोप केला. सभापती मेंढे यांनी, या दोघांनी बेकायदेशीर दिलेल्या एनओसीच्या चौकशीचे आदेशही दिले.महापालिकेकडे इंधनासाठी निधी नाही म्हणून शवववाहिकेची गाडी दोन तास थांबली, याला जबाबदार कोण? स्वच्छतागृहे, शौचालये स्वच्छ करण्यासाठी गाड्या आहेत, मात्र त्या सुरु नाहीत, याबाबत सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)वैद्यकीय अधिकारी निशाण्यावर! आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी आहे. काहीही काम सांगितले तरी मला माहीत नाही, बघून सांगते, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आरोग्यच्या आरटीएस विभागाचीही जबाबदारी डॉ. कुलकर्णी यांच्याकडे आहे. या विभागाचा तर अक्षरश: गोंधळ सुरु आहे. या विभागाच्या समितीची मुदत संपून एक वर्ष झाले, तरी नवीन समिती नियुक्त नाही. या विभागावर कुणाचेच नियंत्रण नाही.एक तर त्यांच्याकडून जबाबदारी काढून घ्या, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी माने यांनी केली.