शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळचे सभापती कोण?

By admin | Updated: February 27, 2017 23:41 IST

तालुक्यात चर्चा : मनोहर पाटील, मदन पाटील यांची नावे आघाडीवर

लखन घोरपडे ल्ल देशिंगकवठेमहांकाळ पंचायत समितीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत सोळा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. आता सतरावा सभापती कोण असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पंचायत समिती स्थापनेपासूनच्या बावन्न वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत सोळा जणांना सभापती पदाची संधी मिळाली आहे. पंचायत समितीची पहिली पंचवार्षिक निवडणूक १९६५ मध्ये झाली. यावेळी पहिले सभापती म्हणून माधवराव शिंदे यांना संधी मिळाली, तर दुसऱ्यावेळी १९६७ मध्ये गणपतराव ओलेकर यांनी सर्वाधिक सलग बारा वर्षे सभापतीपद भूषविले. त्यानंतर नानासाहेब सगरे यांना १९७९ ते ९० असा सलग अकरा वर्षे हे पद भूषविण्याचा मान मिळाला. त्यानंतर मात्र पंचायत समितीवर दोन वर्षे प्रशासकाची नेमणूक झाली. पुन्हा १९९२ नंतर अजितराव घोरपडे यांना तीन वर्षे सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली, तर पंडितराव जगदाळे यांची दहा महिने प्रभारी सभापती म्हणून नेमणूक झाली. पंचायत समितीच्या स्थापनेच्या तब्बल ३२ वर्षांनंतर १९९६ मध्ये सुमनताई नारायण पाटील यांना पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळाला. यात आतापर्यंत केवळ चारच महिलांनी सभापतीपद भूषविले आहे. पाटील यांच्यानंतर विलास पवार यांनी आठ महिने, अजित कारंडे यांनी एक वर्ष, तर विमल बंडगर यांनी तीन वर्षे सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर सत्तार तांबोळी तीन वर्षे, चंद्रकांत हाक्के दोन वर्षे, जालिंदर देसाई, मदन पाटील हे प्रत्येकी अडीच वर्षे सभापती होते. त्यानंतर महिला गटातून सुरेखा कोळेकर, वैशाली पाटील यांनी अडीच वर्ष हे पद पटकाविले. यांच्यासह आतापर्यंत सोळा जणांना सभापती पदाचा बहुमान मिळाला आहे. आता सतरावा सभापती कोण होणार, याकडे तालुक्याच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अजितराव घोरपडे : सभापती ते मंत्री अनेक तालुक्यांमधून पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले की लगेच काहींनी राज्याच्या मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे, तर काहीजण आमदार, खासदार झाले आहेत. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातून केवळ अजितराव घोरपडे यांचा पंचायत समितीचे सभापती ते थेट मंत्री असा, थक्क करणारा राजकीय प्रवास झाला आहे.मनोहर पाटील यांना संधी मिळणार ?नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी विकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. त्यातच सभापतीपद खुले आहे. कुची, देशिंग, कोकळे हे तीन गण सर्वसाधारण असल्याने येथून मदन पाटील, मनोहर पाटील हे विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोघांचीही नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत. परंतु मदन पाटील यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे. त्यामुळे यावेळी देशिंग गणातून विजयी झालेले मनोहर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.