शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू योजनेच्या पाण्याचे उचल परवाने तातडीने द्यावेत

By admin | Updated: June 24, 2016 01:14 IST

बाळासाहेब नायकवडी : २६ जूनच्या आटपाडीतील पाणी परिषदेत प्रमुख मागणी करणार

आटपाडी : राजकारणी मंडळींनी आटपाडी तालुक्यातील लोकांच्या भावनांचे राजकारण करू नये. या लोकांना निदान मदत करता आली नाही, तरी अन्याय तरी करू नका. टेंभू योजनेच्या तालुक्यात येणाऱ्या पाण्याचे उचलपरवाने तातडीने इथल्या शेतकऱ्यांना द्या. रविवार, दि. २६ जूनरोजी आटपाडीत होणाऱ्या पाणी परिषदेतही प्रमुख मागणी करणार आहे, अशी माहिती पाणी चळवळीचे नेते प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी दिली.टेंभू योजनेचे पाणी सध्या कडेगाव आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उचलपरवाने देऊन या पाण्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना अधिक होत असताना आटपाडीकरांवर मात्र या पाण्याकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना परवाने दिले जात नाहीत. आटपाडीकरांवर होत असलेल्या अन्यायाला ‘लोकमत’ने गुरुवारी दि. २३ जूनच्या अंकात वाचा फोडली. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब नायकवडी म्हणाले, पाणी चळवळीचा अनेक राजकारणी मंडळींनी आपल्या भागात पाणी नेण्यासाठी उपयोग केला. पण आटपाडी तालुक्यातील जनतेने २३ वर्र्षांपूर्वी हे पाणी येण्यासाठी मोठी चळवळ केली. पाणी येण्यात या तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना लोकांना पाणी देण्यामध्ये राजकारण येणे दुर्देवी आहे. आता चळवळींची आटपाडीकरांवर अन्याय दूर करा, तातडीने परवाने द्या, अशी मागणी आहे. यावेळी प्रा. बी. के. पाटील, सुरेश जाधव, व्ही. ए. शिंदे, एम. डी. कांबळे हे चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)अकारण फसवणुकीचा प्रकार...चार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी १४० कोटी, गेल्यावर्षी ५५ कोटी आणि यावर्षी ८० कोटींची तरतूद केली. टेंभू योजनेचा समावेश पंतप्रधानांच्या सिंचन योजनेत करावा. २००० कोटी निधीमध्ये टेंभूचे ७५ टक्के काम होईल. शेतात पाणी देण्यासाठी पोटकालवे काढावेत. कारण बंद पाईपलाईनने पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या आराखड्यात टेंभूचा समावेश नाही. काहीजण अकारण लोकांची फसवणूक करीत आहेत, असा गंभीर आरोप बाळासाहेब नायकवडी यांनी केला.