शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

बेकायदेशीर मंचावर बेफिकिरीचा प्रयोग

By admin | Updated: February 9, 2015 01:14 IST

बालगंधर्व नाट्यगृहाची अवस्था : परिपूर्तता प्रमाणपत्र, आगप्रतिबंधक कायद्याला ठेंगा

अविनाश कोळी = सांगली -सर्वसामान्य नागरिकांना नियमांच्या कचाट्यात पकडणाऱ्या महापालिकेने नाट्यगृहांमधील सुरक्षा, सेवा-सुविधा आणि नियमांना तिलांजली देत बेफिकिरीचा प्रयोग सुरूच ठेवला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, संघटनांनी अनेकदा धोक्याची घंटा वाजवूनही, ही खेळाचीच घंटा असावी, असा गोड समज महापालिका प्रशासनाने करून घेतला आहे. त्यामुळेच गेल्या आठ वर्षांपासून मिरजेतील महापालिका मालकीचे बालगंधर्व नाट्यगृह परिपूर्तता प्रमाणपत्राशिवाय (कम्प्लिशन सर्टिफिकेट) सुरू आहे. तत्कालीन नगरपालिका आणि आताच्या महापालिकेने मिरजेतील नाट्यगृहाबाबत नेहमीच उदासीनता दाखविली. आधुनिक व देखणी इमारत उभी राहण्यापूर्वी याठिकाणच्या जुन्या नाट्यगृहात भंगार ठेवण्यात येत होते. रंगकर्मींनी याबाबत संघर्ष केल्यानंतर महापालिकेच्या कालावधित नवीन इमारत उभी राहिली. इमारत उभी राहताना अनेक त्रुटींचे भंगार पुन्हा नाट्यगृहात गोळा झाले. नाट्यगृहांतर्गत रचना, प्रकाश व ध्वनिव्यवस्था, जनरेटर अशा अनेक गोष्टींबद्दल रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांमधून सुरुवातीच्या काळात नाराजी व्यक्त झाली. अन्य इमारतींना परिपूर्तता प्रमाणपत्र नसेल, तर अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या महापालिकेकडे या नाट्यगृहाचे परिपूर्तता प्रमाणपत्रच नाही. याबाबत मिरजेतील गोविंद देवराव खाडिलकर यांनी तक्रारही केली. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून १९ जून २००६ रोजी या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यात आले. खाडिलकर यांनी तब्बल आठ वर्षांपासून नाट्यगृहातील गैरसुविधा आणि नियमबाह्य कारभाराविरुद्ध संघर्ष केला. महापालिका, तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी अशा प्रत्येक पातळीवर त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. मिरज येथील न्यायालयात खाडिलकर यांनी २००७ मध्ये याबाबत दावा दाखल केला. त्यानंतर २८ जुलै २००८ रोजी नाट्यगृहातील त्रुटी एक वर्षात दूर करण्याचे लेखी आश्वासन उपायुक्तांनी सादर केले होते. त्यामुळे या दाव्यात तडजोड होऊन हुकूमनामा झाला व तडजोडीची कार्यवाही जुलै २००९ अखेर पूर्ण करण्याचे महापालिकेने मान्य केले. प्रत्यक्षात आजही अनेक गैरसोयींनी आणि असुरक्षिततेच्या छायेखाली नाट्यगृह सुरू आहे. दिल्ली येथील अलंकार टॉकीजमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते. त्यांचेही पालन महापालिकेकडून नाट्यगृहांच्या बाबतीत झालेले नाही. नियम मोडून नियम शिकविण्याचे काममहाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसारही आवश्यक त्या उपाययोजना अद्याप नाट्यगृहात नाहीत. शहरातील सर्व रुग्णालये, मॉल, थिएटर, व्यावसायिक इमारती, उद्योग यांना याच नियमांआधारे वेठीस धरणारे प्रशासन स्वत:च्या इमारतींबाबत पूर्णपणे गाफील आहे. स्वत: नियम मोडून दुसऱ्यांना नियम शिकविण्याचे काम सुरू आहे.सर्कसवाल्यांना दंडसर्कसचा तंबू कोणत्याही प्रकारच्या बांधकामात येत नसतानाही, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने १९९९ मध्ये सर्कसकडून अग्निशमन कर वसूल केल्याची नोंद आहे. सुरक्षेच्या याच उपाययोजना महापालिकेच्याच नाट्यगृहांमध्ये नाहीत, याकडे प्रशासनाने व महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दुर्लक्ष केले. प्रिमायसेस परवाना व परवान्यांचे नूतनीकरण या विषयावरून सध्या सांगली, मिरजेतील नाट्यगृहांचा कारभार वादात सापडला आहे. नाट्यगृहांना नूतनीकरणाशिवाय प्रयोग करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध केला आहे. नाट्यगृहांचा कारभार, अवस्था, करमणूक कर विभागासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका, सुरक्षेच्या उपाययोजना, सुविधा याबाबतची वस्तुस्थिती या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारी मालिका वाचा आजपासून...