शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

टी.व्ही.च्या कच्च्या मालास दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ग्लास एज व त्याच्या आधारावर होणाऱ्या ओपन सेल टी.व्ही. पॅनेलचे उत्पादन विस्कळीत झाल्यामुळे भारतीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ग्लास एज व त्याच्या आधारावर होणाऱ्या ओपन सेल टी.व्ही. पॅनेलचे उत्पादन विस्कळीत झाल्यामुळे भारतीय टी.व्ही. उत्पादक कंपन्यांना दरवाढीचा शॉक बसला आहे. दिवसेंदिवस पॅनेलचे दर वाढत असल्याने भारतीय कंपन्यांची चिंता वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांत यामध्ये ५० टक्के दरवाढीचा फटका भारतीय कंपन्यांना बसला आहे. पुढील वर्षीसुद्धा ही समस्या कायम राहणार आहे.

ओपन सेल पॅनेलचे उत्पादन केवळ चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांमध्येच होते. एलईडी टीव्ही पॅनेलमधील ७० ते ८० टक्के उलाढाल चायनीज कंपन्यांकडून होते. त्यामुळे पॅनेलबाबत जगातील उद्योजक चीनवर अवलंबून आहेत. भारतातही चीनच्या पॅनलचा वापर अधिक होतो.

ग्लास एज हा एक पॅनलचा थर आहे. त्याचे उत्पादन करणाऱ्या चीनमधील दोन्ही कंपन्यांच्या मशिनरी गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे पॅनल तयार करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन विस्कळीत झाले. मागणीच्या तुलनेत तूट वाढत गेल्याने बाजारातील पॅनलचे दर वाढत आहेत. दोन महिन्यांपूर्वी पॅनलचा दर ३८ डॉलर इतका होता, तो आता ७८ वर गेला आहे. म्हणजेच तो दुप्पट झाला आहे.

भारतात ऑक्टोबरपासून पॅनलवर पुन्हा पाच टक्के आयात शुल्क लागू झाले आहे. त्यामुळे दरवाढ झाली होती. जीएसटी, आयात शुल्क, शिपिंग शुल्क यांचा विचार करता हे पॅनल भारतात टी.व्ही. उत्पादक कंपन्यांकडे येईपर्यंत महागडे होत आहेत.

सध्या पॅनलच्या वाढत्या दरामुळे टी.व्ही.च्या किमती वाढत आहेत. तरीही प्रमुख उत्पादक कंपन्यांनी नफ्याचे प्रमाण कमी करून दरवाढ सोसली आहे. तरीही ही तूट यापुढे सहन करणे उत्पादकांना शक्य नसल्याने टी.व्ही.च्या किमती वाढणार आहेत.

चौकट

शिपिंगच्या दरवाढीचा दणका

सध्या शिपिंगच्या दरवाढीचा दणका टी.व्ही.च्या कच्च्या मालासही बसत आहे. ज्या मार्गावर पूर्वी प्रतिकंटेनर एक हजार २०० डॉलर दर (सी फ्रेट) होता, तो आता तीन हजार ८०० पर्यंत वाढला आहे. त्यामुळे पॅनलच्या दरात तितकी वाढ होत आहे.

कोट

टी.व्ही.च्या ओपन सेल पॅनलमध्ये अनपेक्षित मोठी दरवाढ झाली आहे. जुलै २०२१ पर्यंत दरवाढीचा आलेख वाढतच जाणार आहे. सर्वाधिक चालणाऱ्या ३२ इंची टी.व्ही. पॅनलचा १०० टक्के तुटवडा आहे. त्यामुळे उत्पादकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

- घनश्याम आवटे, टी.व्ही. उत्पादक