शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जत तालुक्यामधील दहा तलाव कोरडे

By admin | Updated: August 26, 2015 23:12 IST

भूजल पातळी घटली : केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक; टॅँकर भरण्यासाठीही पाणी नाही

गजानन पाटील - संखउन्हाची वाढती तीव्रता, मान्सून पावसाने दिलेली दडी, अवाजवी पाणी उपसा यामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडू लागले आहेत. २६ तलावांपैकी १० तलाव कोरडे व १० तलावातील पाणीपातळी मृतसंचयाखाली गेली आहे. तालुक्यातील भूजल पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. डाळिंब, द्राक्षे, फळबागांच्या पाण्यासाठी शेतकरी कूपनलिका, विहिरींची खुदाई करू लागला आहे. तलावामध्ये १० ते १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाची गडद छाया निर्माण झाली आहे. सध्या महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. पाण्याचा उद्भव साठा संपत आल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.दुष्काळ हा तालुक्याच्या पाचवीला पूजलेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊसच झाला नसल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तालुक्यामध्ये सरासरी पर्जन्यमान ५२० मि. मी. इतके आहे. आजअखेर पक्त ८० ते ८५ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. पूर्व भागातील संख, दरीबडची परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे. खरिपाची पेरणीच झाली नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी विक्रमी प्रथमच ७०० ते ८०० फुटांपर्यंत गेली आहे. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब, फळबागा धोक्यात आल्या आहेत. विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. रानामध्ये खुरट्या गवताची उगवण झाली नसल्याने पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मेंढपाळ शेळ्या, मेंढ्या घेऊन कऱ्हाड, सातारा, कर्नाटकातील काळ्या रानाच्या भागात व नदीकाठच्या परिसरात स्थलांतरित झाले आहेत. यावेळी प्रथमच या भागातून मेंढपाळांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. दरवर्षी कोल्हापूर भागातील मेंढपाळ येथे येतात. यावर्षी रानात गवत नसल्याने मेंढपाळ आले नाहीत.शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब, फळबागा घेतल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये छाटणी केली जाणार आहे. डाळिंब, फळबागांना मे महिन्यात पाणी सोडले आहे. फळधारणा झालेली आहे. सध्या डाळिंबाची फळे सुपारी, पेरूच्या आकाराची झाली आहेत. फळबागांना पाण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी रासायनिक खते, औषधावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. बागा वाचविण्यासाठी विहीर, कूपनलिका खुदाई शेतकरी करू लागला आहे. तसेच खरीप हंगामाची फक्त २९ टक्केच पेरणी झालेली आहे. झालेल्या पेरणीतील पिकेही पावसाअभावी वाळून गेली आहेत.निम्मा पावसाळा झाला तरी सुद्धा दमदार पाऊस न पडल्यामुळे तालुक्यातील २६ तलावांपैकी १० तलाव कोरडे असून, १० तलावांतील पाणी पातळी मृतसंचयाखाली गेली आहे. सहा तलावांमध्ये फक्त १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मिरवाड, डफळापूर, बिळूर, दरीबडची, उमराणी, बेळोंडगी, खोजानवाडी, गुगवाड, तिकोंडी -१, तिकोंडी- २ हे तलाव कोरडे पडलेआहेत. तसेच संख मध्यम प्रकल्प व दोड्डानाला मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा मृतसंचयाखाली आला आहे. दरीबडची साठवण तलाव कोरडादरीबडची परिसरामध्ये गेल्या ५ वर्षापासून पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर हा साठवण तलाव भरलाच नाही. या तलावात ४ कि.मी. अंतरावरून पाणी येते. उद्भव साठ्यात वाटेत बंधारे, पाझर तलाव आहेत. ते भरून पाणी द्यावे लागते.टॅँकरची वाढती संख्यातालुक्यातील २५ गावे आणि त्याखालील २१८ वाड्या-वस्त्यांवर २९ टॅँकरद्वारे ७७ हजार १३० नागरिकांना प्रतिदिन ३४ लाख ८ हजार लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मोरबगी, घोलेश्वर, सोनलगी, आवंढी, लोहगाव, बालगाव या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांनी टॅँकरची मागणी केली आहे. सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंत तालुक्यात ४५ टॅँकर सुरू करावे लागणार आहेत. यामुळे प्रशासनाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.