शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

नियम मोडणाऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांवर कारवाई करा

By admin | Updated: December 30, 2014 23:28 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : जनता दलाची निदर्शने

सांगली : एफआरपीप्रमाणे व वेळेत ऊस बिल न देणाऱ्या साखर कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी जनता दलाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार शरद पाटील यांनी केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांचा २०१४-१५ चा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन १९०० रुपये जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल २५०० रुपये, तर काहींनी २६४० इतकी जाहीर केली आहे. उत्पादन खर्चही समान आहे, मग सांगली जिल्ह्यातील कारखानदार कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांप्रमाणे ऊसदर का देत नाहीत, याचा विचार झाला पाहिजे. गळीत हंगामातील अंतिम दर व पहिली उचल जाहीर न करताच काहींनी सरकारचा गाळप परवाना न घेताच गळीत हंगाम सुरू केला आहे. याचीही चौकशी करण्यात यावी. एफआरपीप्रमाणे उसाला दर न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या अध्यक्ष व संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, ऊस गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांत पहिला हप्ता न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या अध्यक्ष, संचालकांवर फौजदारी करण्यात यावी, उसाला पहिली उचल २६५० रुपये देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे शासन व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. आंदोलनामध्ये जनार्दन गोंधळी, भूपाल चौगुले, जिनगोंडा पाटील, भरतेश्वर पाटील, रामचंद्र माळी, राजाराम चोपडे, डॉ. जयपाल चौगुले, शशिकांत गायकवाड, प्रभाकर पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)