शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

‘वसंतदादा’च्या संचालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: January 13, 2017 23:46 IST

कायदेशीर सल्ल्यासाठी प्रयत्न : कारवाई चुकीची असल्याचा दावा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या संचालक व अधिकाऱ्यांपैकी २८ जणांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या निर्णयाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर लगेचच बँकेच्या अधिकारी आणि संचालकांनी कायदेशीर सल्ला घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बँकेच्या चौकशी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा ते न्यायालयात करणार आहेत.बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने विनातारण कर्जे, कमी तारणावर जादा कर्ज व थकबाकीदारांना पुन्हा कर्ज दिले. त्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंतरिम अहवाल बँकेचे तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक आर. एस. शिर्के यांनी १६ मे २००८ रोजी दिला होता. त्या अहवालानुसार आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ६ मे २००९ रोजी सहकार आयुक्त यांनी उपनिबंधक व्ही. पी. पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर २८ आॅगस्ट २०१० रोजी पाटील यांच्याजागी महेश कदम यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १८ जानेवारी २०११ रोजी या चौकशीलाच स्थगिती दिली होती. भाजप-सेना युती सरकार सत्तेवर आल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही स्थगिती उठविली व चौकशीचे काम पुढे सुरू झाले. अ‍ॅड. आर. डी. रैनाक यांनी नियम ७२ (२) नुसार जाबदारांकडून खुलासा मागविला व ७२ (३) नुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे. तशा स्वरूपाच्या नोटिसा त्यांनी दोषींना पाठविल्या होत्या. सुरुवातीला ७३ कर्मचारी, अधिकारी व ३४ संचालकांकडून खुलासा मागविला होता. चौकशीनंतर ७१ कर्मचारी व चार संचालकांना वगळण्यात आले आहे. दोषारोपपत्र ठेवण्यात आलेल्या ३० माजी संचालकांपैकी दिवंगत तीन संचालकांच्या ११ वारसांचा समावेश आहे.वसंतदादा बँकेतील चुकीच्या कारभारामुळे बँकेचे २४७ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करुन सहकार कायदा १९६० च्या कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चितीची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत या कारवाईतून सुटण्यासाठी संबंधित संचालकांनी विविध मार्गाने प्रयत्न केले होते. सरकारच्या माध्यमातूनही चौकशी थांबविणे, रद्द करणे यासाठी प्रयत्न करण्यात आले.मात्र चुकीच्या कारभाराचा फटका बसलेले काही ठेवीदार व सभासद अधिक जागरुक असल्याने व त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कारवाईस गती येत आहे. या चौकशीतून निघणारा अंतिम निष्कर्ष सफल होऊ नये, आपल्यावर रक्कम वसुलीसाठी जबाबदारी निश्चित झाल्यास ती वसूल करण्यासाठी काही हाती लागू नये, यासाठी संबंधित संचालक व अधिकारी आपल्या मालमत्तेची त्यापूर्वीच सुरक्षित विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब जागरूक सभासद, ठेवीदार यांंनी सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्याबाबतच्या कारवाईस पाठपुरावाही केला. त्यामुळेच यापैकी २६ संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेऊन, तसे आदेश काढण्यात आले. संचालकांच्या मालमत्ता जप्त का करु नयेत, याबाबतचे आदेश चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी काढले आहेत. मागील काही दिवसांपासून चौकशी सुरु असल्याने त्याबाबत जिल्'ात खळबळ उडाली आहे.