शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट बियाणांचा सोयाबीनला फटका

By admin | Updated: September 7, 2014 23:23 IST

व्यापाऱ्यांकडूनही लूट : उत्पादनात घट; शेतकरी हवालदिल

सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज --मिरज पश्चिम भागात सोयाबीनची काढणी-मळणी सुरू झाली असून निकृष्ट बियाणांमुळे वाढ खुंटलेल्या सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. पण आर्द्रता, घटलेला दर, वजनातील फरक यासाठी विविध युक्त्या करीत व्यापाऱ्यांकडूनही सोयाबीन उत्पादकांची लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई करून बियाणे कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे भरमसाट दराने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले. ८०, ९० रुपये किलो बियाणांचा दर होता. त्यामुळे सोयाबीनची वाढच झाली नाही. शेंगांची संख्या अत्यल्प होती. त्यातच महिनाभर पाऊस लांबला. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस पाणी पाजून सोयाबीन जगविले. रोग, किडीकरिता आणि वाढीकरिता खते, औषधांचा हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. पण निकृष्ट बियाणांमुळे पिकांची वाढच झाली नाही.सध्याचा पावसाचा बेत टाळून सोयाबीन काढणी, मळणी सुरू आहे. मात्र उत्पादन निमपटीपेक्षाही घटलेले आहे. सोयाबीनचे दाणे बारीक आहेत. त्यामुळे प्रतिएकरी उतारा १२ ते १४ क्विंटलवरून ५-६ क्विंटलपर्यंत घसरला आहे. यामुळे उत्पादक हताश झाला आहे.सध्या काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी २५०० ते ३००० आणि प्रतिपोते मळणी १००-२५० रुपये असा एकरी ५ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च उत्पादकांना परवडणारा नाही.पंधरवड्यापूर्वी ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल १० मॉयश्चरसाठी असलेला दर सध्या व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खाली आणला आहे. सध्या हा दर ३ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. मॉयश्चरच्या प्रमाणात हा दर २२०० ते २४०० पर्यंत पाडला जात आहे. ज्याप्रमाणे मॉयश्चरच्या प्रमाणात फसवणूक होते, त्याचप्रमाणे वजनातही काटामारी काही ठिकाणी होत आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची दुहेरी लूट होत आहे.काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी पाच हजार रुपये खर्च न परवडणारा.व्यापारी वर्गाकडून आर्र्द्रतेच्या प्रमाणात सोयाबीनचा दर २२०० ते २४०० पर्यंत खाली आणून उत्पादकाची पिळवणूक.काही ठिकाणी वजनातही काटामारी.पाऊस लांबल्याने निकृष्ट बियाणांमुळे वाढीवर परिणाम.योग्यरितीने वाढ न झाल्याने प्रतिएकरी उताऱ्याची १२ ते १४ वरून ५ ते ६ क्विंटलपर्यंत घसरण