शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीच्या गोडव्याने होणार हंगामाचा श्रीगणेशा

By admin | Updated: October 6, 2015 23:47 IST

जिल्ह्यातून १३.२७ लाख क्विंटल साखर जाणार : कारखान्यांना केंद्र, राज्याकडून क्विंटलला ५०० रुपये अनुदान

अशोक डोंबाळे -सांगली---साखरेच्या गडगडणाऱ्या दरामुळे साखर उद्योग सध्या गॅसवर आहे. या उद्योगाला दिलासा देण्यासाठी १५ टक्के साखर निर्यातीचा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाने घेतला आहे. निर्यात साखरेला प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातून आठ दिवसांत १३ लाख २७ हजार ५७३ क्विंटल साखर निर्यात होणार आहे. यामुळे निर्यातीच्या गोडव्याने यावर्षीच्या गळीत हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे.जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या वर्षामध्ये ७७ लाख ४३ हजार ४३२ टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर तयार झाली होती. मागील गळीत हंगामाचीही साखर शिल्लक राहिल्यामुळे जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखरसाठा कारखान्यांकडे शिल्लक आहे. शिवाय, २०१५-१६ चा गळीत हंगामही १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, कारखान्यांसमोर साखर ठेवण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण, सध्याही साखरेचे दर फारसे वाढले नसल्यामुळे कारखान्यांनी विक्री थांबविली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साखरेचे दर पुन्हा उतरतील, अशी भीती कारखान्यांना आहे. हा धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येक कारखान्यांना पत्रव्यवहार करून १५ टक्के साखर निर्यात करण्याची सूचना दिली आहे. या निर्यातीवर साखरेला प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी निर्यातीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातून सुमारे १३ लाख २७ हजार ५७३ क्विंटल साखर निर्यात होणार आहे. निर्यात वाढली, तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. दर वाढले तर अर्थातच कारखान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.शासनाकडून १५ टक्के साखर निर्यात करण्याचे पत्र आमच्या कारखान्याकडे आले आहे. त्यानुसार आम्ही दीड ते दोन लाख क्विंटल साखर निर्यात करणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल निर्यातीसाठी कारखान्यास ५०० ते ६०० रुपये अनुदान मिळणार आहे. शासनाने कायमस्वरूपी असेच धोरण ठेवल्यास निश्चितच साखर उद्योगाला चांगले दिवस येतील.- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल.खासगी कारखानदार चिंतेतकेंद्र आणि राज्य शासनाने अडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्यासाठी प्रति क्विंटल साखरेला कर्जाची हमी घेऊन व्याज सवलत दिली आहे. परंतु, या अनुदानाचा फायदा केवळ सहकारी कारखान्यांनाच होणार आहे. खासगी साखर कारखान्यांना शासनाने कोणतीही सवलत दिली नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. आता शासनाने निर्यात साखरेलाही प्रति क्विंटल साखरेला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचाही आपणास फायदा होणार नसल्याचे दिसत आहे. यामुळे खासगी साखर कारखानदार अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यातून निर्यात होणारी साखरकारखाना निर्यात साखरवसंतदादा५६९२५राजारामबापू (साखराळे)१७६१००विश्वास९२१००हुतात्मा१२४०६५माणगंगा २८०१२महांकाली४९५६०राजारामबापू (वाटेगाव)९३०३०सोनहिरा१४०६७०क्रांती१६१४७५कारखाना निर्यात साखरसर्वोदय८५३७१मोहनराव शिंदे ८४२५५डफळे६८२८०यशवंत (गणपती संघ)२७०४७केन अ‍ॅग्रो८५८७०उदगिरी शुगर७९७०७सदगुरू श्री श्री शुगर८६७०६एकूण १३२७५७३(साखर क्विंटलमध्ये )