शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

सांगलीचे कारागृह झाले ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: August 30, 2015 22:33 IST

क्षमता ओलांडली : २२0 क्षमता असताना ३५१ कैदी

सचिन लाड -- सांगली  --जिल्हा मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे. २२० क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या ३५१ कैदी आहेत. यामध्ये ३४० पुरुष व ११ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्वांवर नजर ठेवताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, मारामारी, दरोडा, वाटमारी, घरफोडी, जातीवाचक शिवीगाळ, बेकायदा हत्यार बाळगणे, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात आहेत. शिक्षा लागल्यानंतर या कैद्यांना पुढे कोल्हापुरात कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात हलविले जाते. एखाद्या गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक झाली की, त्याची पोलीस कोठडी घेतली जाते. तपास संपल्यानंतर या आरोपींची न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) रवानगी होती. हा आरोपी जामिनासाठी अर्ज करतो. पण न्यायालयाने जामीन फेटाळला तर त्याला कारागृहातच ठेवले जाते. प्रत्येक पंधरा दिवसाला त्याला न्यायालयात उभे करून कारागृहात ठेवण्याची मुदत वाढवून घेतली जाते. २२० कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. यामध्ये २१२ पुरुष व आठ महिलांची क्षमता आहे, पण गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कारागृहातील कच्चा कैद्यांची संख्या वाढत गेली.दररोज दोन-चार कैदी जामिनावर बाहेर येत असले तरी, तेवढेच विविध गुन्ह्यात कारागृहात जात आहेत. त्यामुळे कैद्यांच्या संख्येचा हा आकडा कधी वाढतो, तर कधी स्थिर राहतो. कैद्यांची दिवसेंदिवस वाढत असणारी संख्या, कारागृहाच्या सभोवताली वाढलेली लोकवस्ती पाहिली, तर सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. ३५१ कैद्यांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक कैद्यांना दररोज न्यायालयातील सुनावणीला हजर करावे लागते. हे काम पोलिसांचे असले तरी, कर्मचाऱ्यांना या कैद्यांना आतून सुरक्षित आणावे लागते.खुनाच्या गुन्ह्यात अनेक संशयितांचे खटले न्यायालयीन पटलावर आलेले नाहीत. चार वर्षापूवी झालेल्या खून प्रकरणांची प्रक्रियाही रेंगाळली आहे. त्यामुळे यातील संशयित कारागृहातच अडकले असल्याचे चित्र आहे. कैद्यांची वाढती संख्या, कारागृहाची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व्हावी, यासाठी सांगलीचे कारागृह हलविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा घेतली जाणार आहे. दीडशे एकर असलेली ही जागा सध्या एमआयडीसीच्या ताब्यात आहे. ती कारागृहासाठी मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार प्रयत्न करीत आहेत.