शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

तासगावच्या सूतगिरणीस ३८ लाखांची कर्ज सवलत

By admin | Updated: August 30, 2015 22:35 IST

संचालक मंडळाचा निर्णय : अनेक संस्थांना लाभ--जिल्हा बँक गैरव्यवहार-१

सांगली : संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीवरून सध्या चर्चेत असलेल्या तासगावच्या स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ३८ लाख ९ हजार रुपयांची कर्ज सवलत दिली होती. १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात या कर्ज सवलतीला १३ संचालकांना जबाबदार धरण्यात आले आहे. ‘रामानंद भारती’प्रमाणेच अनेक संस्थांवर कर्ज सवलतीचा वर्षाव तत्कालीन संचालक मंडळाने केला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे स्वामी रामानंद भारती या सूतगिरणीची उभारणी केली. त्यांच्या निधनानंतर ही संस्था या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. बिनविरोध निवडीचे प्रकरण सध्या न्यायालयात गेले असतानाच, जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणात या सूतगिरणीला दिलेल्या सवलतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. जिल्हा बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी, स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीस ज्या संस्थांवर कर्ज सवलतीचा वर्षाव करण्यात आला, त्या बहुतांश प्रकरणांचा समावेश आरोपपत्रात करुन त्यांनी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरले आहे. या संस्थेस २७ एप्रिल २00७ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन ३८ लाख ९ हजार रुपयांची कर्ज सवलत दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. याप्रकरणी निर्णयप्रक्रियेत असलेल्या तत्कालीन १३ संचालकांना जबाबदार धरले आहे. यामध्ये आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, बँकेचे विद्यमान संचालक प्रा. सिकंदर जमादार, मोहनराव कदम, दिनकरराव हिंदुराव पाटील, लालासाहेब यादव, जगन्नाथ म्हस्के, विजय सगरे आदी नेत्यांचा समावेश आहे. दोन आमदार आणि दोन विद्यमान संचालक या प्रकरणात अडकले आहेत. (प्रतिनिधी)सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी नुकतेच १00 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ९६ पानी आरोपपत्र आणि १८ पानी नोटीस तयार केली आहे. आरोपपत्रात त्यांनी नुकसानीसाठी सात विद्यमान संचालक, ३६ माजी संचालक, ५0 वारसदार आणि ७ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. आरोपपत्रातील विविध प्रकरणांवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून....