शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चोवीस योजनांमध्ये १.३६ कोटींचा घोटाळा

By admin | Updated: April 10, 2015 23:35 IST

ठेकेदारांमध्ये खळबळ : पाणीपुरवठा समिती अध्यक्षांसह ५६ जणांच्या मालमत्तेवर बोजा चढविणार

सांगली : जत तालुक्यातील २४ गावांमधील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव आणि तांत्रिक सेवा पुरवठादार अशा ५६ जणांवर एक कोटी ३६ लाखांच्या निधीची जबाबदारी निश्चित केली आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी पाणी योजनांची कामे पूर्ण केली नाहीत. शिल्लक निधीही जिल्हा परिषदेकडे भरला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून शासकीय रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केला आहे. या प्रस्तावावर काय निर्णय घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.पाणी योजनांच्या प्रश्नांवर विधानसभेत ‘लक्षवेधी’ मांडण्यात आली होती. जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या सभेतही पाणी योजनांमधील घोटाळ्यावरून आमदार, खासदारांनी प्रशासनाचे वाभाडे काढले होते. खा. संजयकाका पाटील यांनी पाणी योजनांमध्ये घोटाळा करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी घोटाळेखोरांची यादी देण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार जत तालुक्यातील २४ गावांमधील अपूर्ण योजना आणि घोटाळ्यांचा अहवाल तयार करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. २४ गावांमध्ये ३ कोटी ९० लाखांचा घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच, ठेकेदारांना नोटिसा बजावल्यानंतर त्यातील दोन कोटी ५४ लाखांचा निधी वसूल झाला होता. उर्वरित एक कोटी ३६ लाखांचा निधी वसूल होत नसल्याने २४ गावांमधील समिती अध्यक्ष, सचिव, ठेकेदार, तांत्रिक सेवा पुरवठादार आदी ५६ व्यक्तींवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यांच्याकडून ही रक्कम वसूल होत नसल्याने त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)पाणी योजनांच्या घोटाळ्यातील गावेलमाणतांडा (उटगी), सोनलगी, सुसलाद, खिलारवाडी, गुगवाड, वायफळ, घोलेश्वर, निगडी खुर्द, जिरग्याळ, साळमळगेवाडी, वळसंग, लमाणतांडा (दरीबडची), जालिहाळ, गिरगाव, पांढरेवाडी, आवंढी, कंठी, भिवर्गी, धुळकरवाडी, गोंधळेवाडी, हळ्ळी, करेवाडी (तिकोंडी), खंडनाळ, लकडेवाडी.घोटाळ्याची यांच्यावर जबाबदारी निश्चितभीमराव चव्हाण, कमलाबाई लमाण, मधुकर लमाण- प्रत्येकी ४.७२ लाख, सुरेश पवार- १.५९ लाख, तुकाराम ढिगाले, आक्काताई कुलाळ, संजय कोळे प्रत्येकी ६२ हजार ८१२ रूपये, आप्पासाहेब पांढरे ९८ हजार, राणी ईरकर चार लाख तीन हजार, छायाताई राणगट्टे, तायाप्पा टोणे प्रत्येकी एक लाख ९७ हजार, गजानन भुसनर, गोपीनाथ चव्हाण, उषा लकडे, विलास भुसनर प्रत्येकी एक लाख ५७ हजार, तुकाराम करे, शोभा आमुतट्टी, बाबू काळे, सातू खरात प्रत्येकी एक लाख ५७ हजार, शंकर चव्हाण, ज्योती माने, शंकराप्पा मदने प्रत्येकी एक लाख ३५ हजार, आप्पासाहेब पाटील, म्हाळाप्पा पुजारी प्रत्येकी पाच लाख २९ हजार, विमल माने, अण्णाप्पा खांडेकर प्रत्येकी २७ हजार ९६३ रूपये, बाबूराव कोडग, रघुनाथ पाटील प्रत्येकी तीन हजार ८३ हजार, आप्पासाहेब पाटील, नंदकुमार कंटीकर, सदाशिव शेळके प्रत्येकी दोन लाख १८ हजार, सगोंडा कोकणी ८६ हजार, विद्या कोडग, गणपत कोडग प्रत्येकी सहा लाख दोन हजार, आप्पासाहेब नाईक, मुनेलावेगम नाईक, खंडू तांबे प्रत्येकी एक लाख २५ हजार, अशोक यादव, बापूसाहेब यादव, उर्मिला पाटील प्रत्येकी दोन लाख ८९ हजार, बसवराज खबेकर, महादेवी पाटील प्रत्येकी एक लाख ९४ हजार, सुमित्रा कुंभार, कल्लाप्पा बिराजदार प्रत्येकी एक लाख ३५ हजार, नागराज भोसले ८१ हजार, गोविंद शेजूर दोन लाख ९४ हजार, तांत्रिक सेवा पुरवठादार डी. वाय. चव्हाण दहा लाख ९८ हजार, के. डी. मुल्ला दहा लाख, अशी जबाबदारी निश्चित केली आहे.