राजारामनगर येथे आविष्कारचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांचा सत्कार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनील चव्हाण, भूषण शहा, नजीर शेख, प्रा.कृष्णा मंडले,बालाजी पाटील,विश्वनाथ पाटसुते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आविष्कार कल्चरल ग्रुपचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्या ‘अंतरीचा भेद’ या काव्यसंग्रहाची बडोदा विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी निवड होणे, हे सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.
राजारामनगर येथे आविष्कारचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांचा सत्कार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी बडोदा विद्यापीठातून पदवी मिळविली आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड हे सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते होते. अशा ऐतिहासिक व नामवंत विद्यापीठात प्रा. प्रदीप पाटील यांच्या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. ते गेल्या २५ वर्षांपासून माझे सहकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आविष्कारच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान आहे. हे यश त्यांनी आपल्या गुणवत्तेने प्राप्त केले आहे. कासेगाव शिक्षण संस्थेचा नावलौकिक त्यांनी नेहमीच वाढविला आहे.
यावेळी आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष भूषण शहा, नजीर शेख, प्रा. कृष्णा मंडले, बालाजी पाटील, धनंजय भोसले, ज्ञानदेव देसाई, विश्वनाथ पाटसुते, विजय लाड, विनायक यादव,अजय थोरात उपस्थित होते.