शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
3
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
4
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
5
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
6
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
7
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
8
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
9
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
10
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
12
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
13
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
14
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
15
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
16
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
17
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
18
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

आयएसओ मानांकनासाठी अंगणवाड्या सज्ज

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

जत तालुक्यातील ६० अंगणवाड्यांचा सहभाग : लवकरच समिती पाहणीसाठी दौऱ्यावर

गजानन पाटील-संख --लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील ६० अंगणवाड्या या आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाण) होणार आहेत. आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर समितीकडून पाहणी केली जाणार आहे. दुष्काळी भागातील अंगणवाड्या कात टाकून डिजिटल होणार आहेत. मानांकनासाठी औरंगाबाद येथील कंटीन्यूल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या संस्थेकडे नोंदणी करण्यात आली आहे.तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या मोठ्या अंगणवाड्या ३४५, मिनी अंगणवाड्या ८० आहेत. अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १६ हजार ४२९ विद्यार्थी शिकत आहेत. त्यामध्ये ८ हजार ४०६ मुले व ८ हजार २३ मुली आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जत व उमदी प्रकल्प आहेत. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहेत. या माध्यमांच्या अतिशय सुसज्ज, देखण्या शाळा उभारून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दुसरीकडे गरिबांची शाळा म्हणून अंगणवाड्यांकडे पाहिले जाते. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून जत व उमदी प्रकल्प विभागातून प्रत्येकी ३० अशा ६० अंगणवाड्यांनी आयएसओ स्पर्धेत भाग घेतला आहे. मानांकनासाठी औरंगाबाद येथील कंटीन्यूल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या संस्थेकडे नोंदणी करण्यात आली आहे.सुविचार, शाळेची इमारत, बोलक्या भिंती, फ्री स्कूल एज्युकेशन (पूर्व प्राथमिक शिक्षण), भैतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, बाहेरील खेळ, सौर अभ्यासिका, अत्याधुनिक परसबाग, रेकॉर्ड आदीवर गुणांकन केले जाणार आहे.अंगणवाडी केंद्रात लागणाऱ्या भौतिक सुविधांमध्ये नळ कनेक्शन, वीज पुरवठा, पंखा, एलसीडी, डिजिटल बोर्ड, मॅट, बेंच, कपाट, टेबल, खुर्ची, फिल्टर, गॅस, प्रेशर कुकर, आहार शिजविण्याची भांडी, प्लेट, चमचे, ग्लास, बादली, पिंप, रॅक्स, फिल्टर, आहार, परसबाग, झोपाळा, घसरगुंडी उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच फ्री स्कूल एज्युकेशन (पूर्व प्राथमिक शिक्षण) मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची पूर्वतयारी करणे, त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. तिन्ही भाषेतील बडबड गीते म्हणता आली पाहिजेत. अंगणवाडीमध्ये सौर अभ्यासिका बसविलेली असली पाहिजे. त्याची किंमत १६ हजार आहे. लोकसहभागातून १६०० रुपये गोळा करून आतापर्यंत १५ अंगणवाड्यांमध्ये बसविण्यात आलेले आहे. बोलक्या भिंती डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अंकगणित, प्राणी, फळे, भाजीपाला, बाराखडी, इंग्रजी अक्षरे, महिने, वारांची नावे, भूमितीय आकृत्या, फुले, वजन-मापे, झाडांची नावे आदींचे तक्ते भिंतीवर डिजिटल करून बसविण्यात आले आहेत. रंगरंगोटी केली आहे. महापुरुषांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. महिन्याभरात तयारी झाल्यानंतर समिती येणार आहे. औरंगाबाद संस्थेची दोनवेळा समिती व तिसऱ्या वेळी थर्ड पार्टी (तिऱ्हाईत पार्टी) येणार आहे. गुणदान करून निकाल जाहीर करणार आहे. ही निवड गुणवत्ता व दर्जावर पारदर्शीपणे होणार आहे.आयएसओसाठी तालुक्यातील उमदी प्रकल्पातील पांडोझरी, संख, गोंधळेवाडी, आसंगी तुर्क, भिवर्गी व जत प्रकल्पातील बेळुंखी, विद्यानगर, नवाळवाडी, उमराणी, बागलवाडी या अंगणवाड्यांची तयारी झाली आहे. या अंगणवाड्या डिजिटल बनल्या आहेत.वाळव्यात ३२ आयएसओ अंगणवाड्यायापूर्वी वाळवा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून ३२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.आयएसओचे निकषअंगणवाड्यांतील मुलांची सरासरी ९० टक्के उपस्थितीपूर्वप्राथमिक शिक्षण (फ्री स्कूल एज्युकेशन) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळखभौतिक सुविधासौर अभ्यासिकास्वच्छ परिसर व सुंदर शाळाविशेष उपक्रम कृतीकुटुंब नियोजन कार्यक्रमात विशेष सहभाग व बालविवाह प्रतिबंध उपक्रमात लोकसहभाग