शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातील बदलाने राजकारण बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 01:02 IST

सहकार विभाग : अध्यादेश नसल्याने निर्णयाबाबत नेत्यांत संभ्रम

अविनाश कोळी-- सांगली --सहकार कायद्यातील नव्या बदलाचे परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर्वीच्या बरखास्त बँकांसाठीही हा नियम लागू झाल्यास जिल्ह्यातील अनेक दिग्गज राजकारण्यांना सहकारातील राजकारणापासून दहा वर्षे लांब राहावे लागणार आहे. अद्याप निर्णयाबाबत स्पष्ट माहिती नसल्याने राजकारण्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतरच सहकारात काम करणाऱ्या राजकारण्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 च्या कलम ७३ (क) अ मध्ये नव्याने कलम समाविष्ट करण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्याने सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. सहकारी बँका अवसायनात निघण्याचे सांगली जिल्ह्यातील प्रमाण मोठे आहे. अनेक मोठ्या बँका अवसायनात निघाल्या आहेत. त्याठिकाणी आता प्रशासकांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे सहकारातील भ्रष्ट कारभाराची याठिकाणची प्रकरणे अधिक चर्चेत आहेत. मोठमोठ्या सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या. सर्व बँकांमध्ये जिल्हा बँकेतच राजकारण्यांना सर्वाधिक रस आहे. त्यामुळे याठिकाणच्या राजकारणावर सर्वाधिक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँक २0१२ मध्ये बरखास्त झाली होती. यातील अनेक संचालक सध्याच्या मंडळात काम करीत आहेत. त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होणार की नाही, याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. केवळ नियमातील बदलाचा निर्णय झालेला आहे. तो यापूर्वीच्या बरखास्त संचालक मंडळाला लागू होणार, की निर्णयानंतरच्या कालावधीतील बँकांना लागू होणार, याची माहिती कोणालाच नाही. सहकार विभागानेही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे एकूणच निर्णयातील बारकावे अजून समोर आलेले नाहीत. त्यामुळे सहकारात विशेषत: जिल्हा बँकेत काम करणाऱ्या राजकारण्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम अध्यादेश लागू झाल्यानंतरच दूर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकारण्यांचे लक्ष सहकार विभागाच्या अध्यादेशाकडे लागले आहे. पूर्वीच्या बरखास्त मंडळासाठी हा निर्णय लागू झाल्यास फार मोठे राजकीय बदल सहकार क्षेत्राच्याबाबतीत होऊ शकतात. भविष्यात बरखास्त होणाऱ्या संचालक मंडळासाठी हा निर्णय लागू झाल्यास, केवळ बँकांमधील राजकारण्यांच्या व्यक्तिगत कारभाराला आळा बसू शकतो. राजकीय वर्चस्वात फारसा फरक पडणार नाही. तरीही सहकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या राजकीय मंडळींना या बदलाची धास्ती वाटू लागली आहे. सात संचालकांचा फैसला अध्यादेशानंतरजिल्हा बँक २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त झाली होती. त्यावेळच्या संचालक मंडळातील विलासराव शिंदे, मोहनराव कदम, अनिल बाबर, बी. के. पाटील, डॉ. सिकंदर जमादार, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड असे सातजण विद्यमान संचालक मंडळात कार्यरत आहेत. त्यांच्याही राजकीय भवितव्याचा फैसला अध्यादेश आल्यानंतरच होणार आहे. वारसदारांचे राजकारण होणारजिल्हा बँकेच्या निवडणुकीत चौकशी फीची वसुली लागलेल्या संचालकांच्या अडचणी वाढल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना जिल्हा बॅँकेच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला होता. जुन्या मंडळासाठी निर्णय लागू झाल्यास पुन्हा असाच प्रयत्न जिल्हा बॅँकेशी संबंधित व अडचणीत येणाऱ्या संचालकांकडून होऊ शकतो. राजकीय अस्तित्व टिकविण्याचे अनेक उपायही आतापासूनच शोधले जात आहेत.