शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूतकाळातील चुकांच्या दुरुस्तीची गरज

By admin | Updated: October 12, 2015 00:32 IST

एन. डी. पाटील : रामानंदनगर महाविद्यालयात राष्ट्रीय इतिहास चर्चासत्र

पलूस : आपण कोणाचे वारस आहोत याचा विचार इतिहासात होणे आवश्यक आहे. युगा-युगांच्या काळात दक्षिणेत काय घडले याचा विचार करता, दख्खनची वाट कशीही असो, या वाटचालीत मुख्य प्रवाहांना केंद्रवर्ती मानल्यास सामान्य समाजाची अवस्था या काळात काय होती, याचा विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.रामानंदनगर येथील आर्टस्, सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत इतिहास विषयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कांबळे होते. डॉ. पाटील म्हणाले की, मूठभर समाजाचा विकास होणे म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. इतिहासात काही गोष्टी आपण सतरंजीखाली ढकलतो, त्याचे उत्तर देत नाही. मात्र दख्खनच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ठरविताना सर्वच गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. भूतकाळात आपण ज्या ठिकाणी चुकलो, त्यात दुरुस्त्या होणे अत्यावश्यक आहे. समाज एकजिनसी नव्हता, म्हणून आपण स्वराज्य गमावले. संघर्षानंतर जरी ते मिळविले असले तरी, ते टिकविण्यासाठी समाज एकजिनसी ठेवावा लागेल. समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील कांबळे म्हणाले की, दख्खनच्या पठारावर मराठी सत्तेचा उदय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अनेकांनी राज्य केले. मात्र सर्व राज्यात कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहूंचे संस्थान व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे राज्य, ही दोनच राज्ये महत्त्वाची ठरली. लोकहिताचा कारभार करताना त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या.याप्रसंगी चर्चासत्राचे बीजभाषक प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड (पुणे), प्रा. डॉ. राधिका सेशन (पुणे), प्रा. डॉ. के. एल. एन. मूर्ती (विजापूर), गोपाळराव देशमुख (पंढरपूर), प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे (सावळज) आदींसह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. आर. आर. सोनावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. एस. मारकवाड यांनी आभार मानले.