शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेचे दीडशे थकबाकीदार रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:56 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देअवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेचे दीडशे थकबाकीदार रडारवरवसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम, आता सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.वसंतदादा बँकेची कर्जदारांकडे १५४ कोटी ३ लाख ८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मोहीम हाती घेतली आहे. ज्या कर्जदारांनी नोंद गहाण खताने मिळकत तारण दिलेली आहे, अशा मिळकती कर्ज फिटेपर्यंत बँकेकडे गहाण राहणार आहेत.

त्यामुळे सरफेसी अ‍ॅक्ट (सेक्युरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन आॅफ असेट्स अ‍ॅन्ड इन्फोर्समेंट आॅफ इंटरेस्ट अ‍ॅक्ट २००२) नुसार कारवाई करून वसुली होण्यास या प्रकरणांत वाव असल्याचे अवसायकांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे वसुली प्रक्रिया गतीने होण्यासाठी अवसायकांनी यापूर्वी १०३ लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची मुदत पुढील महिन्यात संपणार असून, त्यानंतर त्यांच्यार कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता आणखी १५० कर्जदार व जामीनदारांची यादी तयार करण्यात आली आहे.

येत्या पंधरवड्यात त्यांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा बजावल्या जाणार आहेत. या कायद्याअंतर्गत कर्जदारांना ६० दिवसांची मुदत आहे. त्या कालावधित त्यांनी थकीत कर्ज भरले नाही, तर संबंधितांची मालमत्ता सरफेसी अ‍ॅक्ट यू/एस-९३ (४) नुसार ताब्यात घेऊन त्याची लिलावाने विक्री करण्यात येणार आहे.शिवाय ज्या कर्जदारांनी कर्ज घेतेवेळी बँकेची फसवणूक करून कर्जे घेतलेली आहेत, अशा कर्जदारांना फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटिसा दिल्या जात आहेत. फौजदारी कारवाई करण्यायोग्य आणखी काही प्रकरणे आहेत का, याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

नोंद गहाण खताने तारण दिलेली शेतजमीन मिळकत व वसुली दाखला मिळालेल्या कर्जदारांच्याबाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या नियम-१०७ (डी-१) (५) नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.बँकेचे अवसायक म्हणून ९ जानेवारी २०१५ रोजी जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आजअखेर साडेसहा कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. विमा कंपनीला अजूनही ७ कोटी ९३ लाख रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रVasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगली