शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

बोरगावमध्ये आजपासून यात्रेचे आयोजन

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

विविध कार्यक्रम : हेमाडपंथी बलभीम देवाचे मंदिर

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील बलभीम देवाची यात्रा दि. २४ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर अशी तीन दिवस चालणार असून, यात्रेचा मुख्य दिवस २६ आॅक्टोबर या दिवशी खारा नैवेद्य व कुस्त्यांचे जंगी मैदान दुपारी ४ वाजता होणार आहे. याबरोबरच चार दिवस करमणुकीचे कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त घेतलेला हा आढावा....उत्तरवाहिनी कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले बोरच्या बनातील गाव म्हणजेच बोरगाव. इंग्रज राजवटीच्या काळात खंडोबा बल्लाळ चिटणीस या वतनदाराला हे गाव वतन दिले. एका रात्री बल्लाळांच्या स्वप्नात बलभीम येऊन, नदीपात्रात श्री हनुमान मूर्ती असल्याचा दृष्टांत झाला. सेवेकऱ्यांच्याकरवी मूर्तीचा शोध नदीपात्रात घेतला असता, अमृतेश्वराजवळ पूर्वाभिमुखी सात फूट उंचीची जांबू माळी वध रुपातील मूर्ती सापडली. ही मूर्ती दगडी गाड्यातून गावाकडे घेऊन जात असताना गावाच्या वेशीत तो गाडा थांबला. गाडा जाग्यावरून हलेनाच. हे लक्षात येताच वतनदार व गावकऱ्यांच्या संगनमताने या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरले. १८ व्या शकतात मूर्तीची प्रतिष्ठापना करून १८५६ मध्ये हेमाडपंथी ७५ फूट उंच व ३५ फूट रुंदीचे दगडी मंदिर उभारण्यात आले. हा दिवस दीपावली पाडव्याचा म्हणजे नरकचतुर्दशीचा असल्याने या देवाची यात्रा दीपावलीदिवशी भरते. गंधलेपातील श्रीची पूजा जांबू माळी वधरुपात उद्या, २४ आॅक्टोबर रोजी बांधली जाते. त्याचदिवशी १२५ ते १५0 पणत्यांनी देऊळ सजविले जाते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, या दिवशी गावातील अबाल महिला, पुरुष, मोहरवाशिणी सायंकाळी पूजेसाठी दर्शनासाठी गर्दी करतात. रात्री १0 वाजता फटाक्यांची आतषबाजी नामांकित बॅन्ड कंपनी, सनई चौघडा, वाद्ये आदी सादर केली जातात. पालखी मध्यरात्री किचात जाते. दसरा चौकात गावातील इतर देवांच्या पालख्यांची भेट होते.या मंदिरातील पालखीचा मान खंडोबल्लाळ चिटणीस वंशजांना दिला जातो, तर पूजेच्या सेवेचा मान हनमंत गुरव व मदन गुरव यांचा आहे. तसेच पालखीचा मान पोलीस पाटील बी. एस. पाटील, जाधव, चौधरी, पवार, लोहार, सुतार, भोई यांना देण्यात आला आहे.यावर्षी करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ आॅक्टोबरला मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, ६ ते ९, २५ रोजी रात्री नऊ वाजता तुफान विनोदी नाटक आम्ही नाटकवाले. रविवार २६ आॅक्टोबर रोजी दुपारी निकाली कुस्त्यांचे मैदान, यात १00 रुपयांपासून १ लाखापर्यंत कुस्त्या होणार आहेत. रात्रौ ९ वाजता कमलाकर कराडकर व वनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे. तसेच खास महिलांसाठी दि. २८ रोजी रात्री ९ वाजता लावण्यवती लता जाधव, पूजा पाटील व पूनम कुडाळकर यांचा ‘तीन तारका’ हा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)