शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तीन घराण्यांतील संघर्षाला नवे वळण

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : पारंपरिक संघर्षाला वारसदारांकडून बळ

अविनाश कोळी - सांगली -वसंतदादा-राजारामबापू यांच्यापासून सुरू झालेला संघर्ष आज ४५ वर्षांनंतरही त्यांच्या वारसदारांनी जिवंत ठेवला आहे. सांगली विधानसभेच्या मैदानात गेल्या सहा वर्षांपासून जयंत पाटील आणि मदन पाटील यांच्यारूपाने या संघर्षाने नवे रूप धारण केले आहे. त्याचबरोबर संभाजी पवार विरुद्ध दादा घराण्यातील संघर्षाची कहाणीही सुरूच आहे. यंदाच्या निवडणुकीत परंपरागत घराणेशाहीतील संघर्षाचे त्रिकुट निर्माण झाल्याने वेगळा इतिहास नोंदला जात आहे. राज्यातील राजकारणात दादा-बापूंमधील संघर्ष नेहमीच चर्चेत येत असतो. २३ नोव्हेंबर १९६३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाले, तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात राजारामबापू व वसंतदादांचे मित्र बॅ. जी. डी. पाटील दोघेही उपमंत्री होते. नाईकांच्या मंत्रिमंडळात राजारामबापूंची बढती करून त्यांना उपमंत्रीपदावरून महसूलमंत्री पदावर बसविण्यात आले. त्यामुळे दादा-बापू संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात वारणा नदीवरील धरणावरून हा संघर्ष विकोपाला गेला. त्यानंतरही अनेक गोष्टींनी या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. संघर्षाची ही अर्धशतकीय कहाणी आजही तशीच ताजी आहे. राजारामबापूंचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू मदन पाटील, प्रतीक पाटील यांच्यात सुरुवातीच्या काळात छुपा संघर्ष होता. महापालिकेच्या २००८ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी उघडपणे दादा घराण्याविरोधात रणशिंग फुंकले. दादा घराण्याशी पूर्वापार संघर्ष करीत आलेले संभाजी पवार यांना त्यांनी सोबत घेतले आणि महापालिकेतील मदन पाटील यांची सत्ता हिसकावून घेतली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही असेच राजकारण झाले आणि मदन पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संभाजी पवारांना आमदार बनविण्यासाठी राष्ट्रवादीची पूर्ण ताकद जयंतरावांनी पणाला लावली होती. या खेळांची कल्पना मदन पाटील यांना होती. त्यामुळेच त्यांनीही जयंतरावांना शह देण्याची तयारी चालू केली. नंतरच्या काळात सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यामध्ये वितुष्ट आले. पवारांनी मदन पाटील यांच्याकडील तोफ पश्चिमेला फिरविली आणि जयंतरावांवर टीका केली. जयंत पाटील यांनी शांतपणे पटावरील प्यादे हलविले आणि पुन्हा नव्या डावाला सुरुवात केली. दुसरीकडे दादा व कदम घराण्याने ताकद एकवटली व महापालिकेतील सत्ता पुन्हा काबीज केली. जयंतरावांवर त्यांचाच डाव उलटविण्यात आला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीने या निवडणुकीत संजय पाटील यांचा प्रचार केल्याचे नंतर उजेडात आले. यामागेही जयंतरावच असावेत, अशी चर्चा सुरू झाली. आताच्या विधानसभा निवडणुकीत उघडपणे दोन्ही घराण्यांकडून कुरघोड्या चालू झाल्या आहेत. जयंतरावांनी सांगलीत, तर प्रतीक व मदन पाटील यांनी इस्लामपुरात पट मांडला आहे. एकमेकांच्या राज्यात रसद पुरवून उघडपणे रणशिंग फुंकण्यात आले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात तर घराणेशाहीच्या संघर्षाचे त्रिकुट दिसत आहे. पवार-दादा-बापू घराण्यातील हा संघर्ष याठिकाणी ठळकपणे मांडला जात आहे. ताकदीचे योद्धेमदन पाटील, जयंत पाटील आणि संभाजी पवार हे तिन्ही नेते जिल्ह्याच्या राजकारणात ताकदीचे मानले जातात. सध्या जयंतरावांकडे संस्थात्मक तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठे बळ आहे, तर मदन पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. जिल्ह्यात आजही दादा गट कार्यरत आहे. संभाजी पवारांना मानणाराही मोठा गट सांगली व परिसरात अस्तित्वात आहे. त्यामुळे तिन्ही नेते एकमेकांविरोधात आपली ताकद पणाला लावत आहेत. जुन्या संघर्षाला नवा आयामराजारामबापू यांचे पुत्र जयंत पाटील आणि वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू असा संघर्ष कधीही झाला नाही. विष्णुअण्णांशीही जयंतरावांचा संघर्ष झाला नाही. जयंतरावांचा थेट दादांच्या नातवांशी संघर्ष सुरू झाला. दुसरीकडे राजारामबापूंचे मानसपुत्र म्हणून संभाजी पवारांचा उल्लेख होतो. तरीही पवारांसह त्यांच्या पुत्राशी जयंतरावांचा संघर्ष सुरू आहे. दादा-बापू घराण्यातील संघर्षात आता पवार घराण्याची भर पडल्याने संघर्षाचा हा तिरंगी सामना भलताच रंगला आहे.