शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

शिराळ्यात यंदा कॉँग्रेस की राष्ट्रवादी?

By admin | Updated: September 5, 2014 00:10 IST

उमेदवारीबाबत संभ्रम : वाळव्याच्या गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. ही जागा काँग्रेसला जाणार की, राष्ट्रवादीला याचा निर्णय झालेला नाही. त्यातच महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवाय ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि गटाची वाळवा तालुक्यातील ५९ गावांमध्ये काय भूमिका असेल, हे गुलदस्त्यात असल्याने आघाडीतील संभ्रम वाढला आहे. जयंत पाटील यावेळी स्वत:चे साडू सत्यजित देशमुख यांच्या पारड्यात वजन टाकणार की, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट झालेले नाही.आघाडीच्या जागावाटपात शिराळ्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना मदत करण्याऐवजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांनीही आघाडीचा धर्म न पाळता मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता.यंदाच्या निवडणुकीत मात्र आघाडीच्या जागेचा घोळ निर्माण झाला आहे. कारण विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी कसल्याही परिस्थितीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केला आहे. सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालववले आहेत. त्यातच ते ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे साडू आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचे वजन यावेळी तरी सत्यजित यांच्यासाठी खर्चले जाणार का, असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते करत आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा करीत, आपल्यालाच आघाडीचे तिकीट मिळणार, असे गृहीत धरले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशमुख आणि आ. नाईक गटातील दरी रूंदावली आहे.महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत मात्र संभ्रम दिसत आहे. (प्रतिनिधी)५९ गावांमधील भूमिका गुलदस्त्यातचशिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ५९ गावे येतात. या गावांचे मतदान निर्णायक ठरते. तेथे जयंत पाटील यांच्यासोबत शिवाजीराव नाईक, महाडिक, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, देशमुख हे गटही प्रबळ आहेत. मात्र खुद्द जयंत पाटील आणि गटाची या ५९ गावांमधील भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. शिवाय सत्यजित देशमुख यांनी शिराळ्यावर दावा केला आहे.जयंत पाटील यांनी शिराळा मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी वेळोवेळी खेळ्या केल्या आहेत. यावेळी मात्र जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी राजू शेट्टी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. महाडिक, सी. बी. पाटील आणि अभिजित पाटील हे महायुतीच्या बाजूने आहेत. त्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे. नानासाहेब महाडिक स्वत: जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांच्यापुढे आव्हान उभे आहे.