शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

कृषीपंपांना बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST

सांगली : कृषी पंपांना अनेक वर्षांपासून बिलेच दिली गेली नसतानाही त्यांच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार मोहीम हाती घतेली आहे. यावर्षी ...

सांगली : कृषी पंपांना अनेक वर्षांपासून बिलेच दिली गेली नसतानाही त्यांच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार मोहीम हाती घतेली आहे. यावर्षी जिल्ह्यातील सर्वच गावांची आणेवारी ५० पैशांहून अधिक असल्याने वसुली अग्रहक्काने सुरू आहे.

वीज वापरासाठी नियमित बिले देणे महावितरणला बंधनकारक आहे. पण ती मिळत नसल्याचा नेहमीचा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीजजोडणी घेतल्यापासून एकदाही बिल मिळाले नसल्याचे सांगितले. कृषी पंपांची विभागणी मीटर व नाॅनमीटर अशा दोन गटांत केली जाते. मीटरला रिडींगनुसार तर नॉन मीटरला अश्वशक्तीनुसार बिल आकारणी केली जाते. शहरी भागात प्रत्येक महिन्याला व ग्रामीण भागात तीन महिन्यांतून एकदा बिल देणे बंधनकारक आहे. पण अनेकदा बिले अंदाजेच दिली जात असल्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

बिलेच येत नसल्याने ती भरण्याच्या फंदात शेतकरी पडत नाहीत. काहीवेळा वसुलीसाठी कर्मचारी येतात. तेव्हा चिरीमिरी देऊन त्यांची परत पाठवणी केली जाते. वसुलीचा त्रागा सुरू झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी बिले मागितली, पण ती मिळाली नाहीत. ऑनलाईन बिले काढली असता ती लाखोंच्या घरात पोहोचल्याचे दिसून आले, त्यामुळे शेतकरी हादरले. त्यामध्ये प्रत्यक्ष विजेचा वापर कमी आणि दंड व व्याजच जास्त असल्याचे आढळले. वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी ताकद लावली असता शेतकरी संघटनेसह काही संघटनांनी कर्मचाऱ्यंना पिटाळण्याच्या घटनाही घ़डल्या, त्यामुळे शेतीपंपांच्या बिल वसुलीमध्ये अधिकारी व कर्मचारीही फारसे उत्सुक दिसत नाहीत.

कोट

कृषीपंपांच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये महाविरणकडे शिल्लक आहेत. त्याचा हिशेब केला असता त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांना पैसे मिळणे आवश्यक ठरते. या स्थितीत शेतकरी बिल भरणार नाही अशी आमची भूमिका आहे. महावितरणने रितसर रिडींग घेऊन बिले द्यावीत, अंदाजे बिले स्वीकारणार नाही.

- महादेव कोरे

कोट

वीजपुरवठा घेतल्यापासून काहीवेळाच बिले मिळाली आहेत. वीजपुरवठा पुरेशा दाबाने व नियमित नसल्याने बिले भरणार नसल्याचे आम्ही स्पष्ट केले आहे. पुरेशी वीज द्यावी आणि रिडींगद्वारे बिले द्यावीत अशी आमची मागणी आहे.

- कमलेश्वर कांबळे

कोट

जितका वीजवापर, तितकीच बिले भरण्यास शेतकरी केव्हाही तयार आहे. पण महावितरणचा कारभार पारदर्शी नाही. त्यामुळे शेतकरी बिले भरत नाहीत.

- नाना काणे

- शेतकऱ्यांना कृषीपंपांची बिले दिली जातात. वसुलीलाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे.

- संजय अवताडे, उपव्यवस्थापक (लेखा), महावितरण, सांगली

तालुकानिहाय कृषी पंप चालक

आटपाडी - १७२१४

जत - ३८५०२

कडेगाव - २०९९२

कवठेमहांकाळ - २२०७८

खानापूर - ३०२८४

मिरज - ३४८०८

पलूस - १२१६१

शिराळा - ७९३६

तासगाव - ३०७४४

वाळवा - २४६११

एकूण कृषीपंप - २ लाख ३९ हजार ३३०

वीजबिल थकबाकी - १०५५ कोटी रुपये