शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आमदार, मंत्री भाजपाच्या कोट्यातून; मला काढणारे शेट्टी कोण? - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:01 IST

  ‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’,

सांगली, दि.18 -  ‘मी सामान्य शेतकरी असूनही माढा लोकसभा मतदारसंघात पाच लाख मते घेतली. खासदार राजू शेट्टी, तुमच्यात हिंमत असेल तर हातकणंगले मतदारसंघाच्या बाहेर जाऊन निवडून येऊन दाखवा’, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.‘मला आमदारपद, मंत्रीपद भाजपाच्या कोट्यातून मिळाले असल्यामुळे, शेट्टींनी काढण्याचा संबंधच कुठे येतो? मला काढायचे की ठेवायचे ते भाजपाचे नेतेच ठरवतील’, असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर खोत यांना राज्य मंत्रिमंडळातून काढण्याबाबत खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता होतो आणि सरकारमध्ये गेल्यानंतरही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. मंत्रीझाल्यानंतरही माझ्या छातीवरचा संघटनेचा बिल्ला मी काढला नव्हता. पण, माझे मंत्रीपद शेट्टींच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे त्यांनी वारंवार माझ्यावरटीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाचाही जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक पराभव केला. तरीही मी संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत होतो. मात्र त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे नाटक करून माझी हकालपट्टी केली. एवढ्यावर समाधान झाले नसल्यामुळे माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत टीका करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.ते म्हणाले की, राजू शेट्टींनी शेतकरी हितापेक्षा स्वत:च्या हितालाच नेहमी प्राधान्य दिले. त्याचा आणि इतर भानगडींचा मी साक्षीदार आहे. ऊसदराबाबत कारखानदारांच्या बैठकीत बोलायचे एक आणि शेतक-यांसमोर दुसरेच सांगायचे. आम्हालाही त्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य वाटायचे.कर्जमाफीबाबतही तसेच झाले. बैठकीत तोडगा मान्य, म्हणून उठले आणि बाहेर येऊन, पूर्ण कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही, अशी घोषणा केली. भाजपा सरकार निवडून आणून चूक झाल्याचे सांगून, सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली जाते. प्रत्यक्षात त्यांना सरकारमध्ये थांबायला कोणी सांगितले आहे? परंतु शेट्टींची सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यांना केवळ सरकारमधील सदाभाऊंची अ‍ॅलर्जी असल्याने हा खटाटोप चालू आहे. मला काढण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशासाठी देता? तुमचा संबंधच काय? मी भाजपच्या कोट्यातून आमदार आणि मंत्री झालो आहे. त्यामुळे मला ठेवायचे की नाही, ते भाजपाचे नेते ठरवतील.खोत म्हणाले की, जनाधार म्हणाल, तर तुम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर पडून कोठूनही निवडून येऊन दाखवावे. मी कायमस्वरूपीराजकारण सोडतो. नाही तर तुम्ही तर राजकारण सोडून दाखवा. तुमच्यात ताकद असेल तर हातकणंगले मतदारसंघातून अन्य कार्यकर्त्याला संधी द्या. मी माढा लोकसभा मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवून पाच लाख मते घेतली. तुम्ही अथवा तुमच्या कार्यकर्त्याने तेथे उभे राहून एक लाख तरी मते घेऊन दाखवावीत. तेथे गेल्यावरच तुमचा जनाधार आणि कार्यकर्ते किती तुमच्या सोबत आहेत ते समजणार आहे.शेट्टींचा हुकूमशाही पध्दतीने कारभारखा. राजू शेट्टींना त्यांच्याशिवाय कोणीही मोठे झालेले आवडत नसल्यामुळे, त्यांनी माझी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. माझ्याप्रमाणेच त्यांनीउल्हास पाटील यांनाही तशीच वागणूक दिली होती. संघटनेतील प्रत्येकाला हुकूमशाही पध्दतीने वागणूक देतात. ते कार्यकर्त्यांना गुलामाप्रमाणेवागवत आहेत. आपण सांगू तीच पूर्व दिशा असली पाहिजे, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी आजपर्यंत संघटनेचा केवळ स्वार्थासाठीच उपयोग केला आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.‘स्वाभिमानी’ची धुरा मी सांभाळली असती...तुम्ही प्रत्येक वेळा शेतक-यांची दिशाभूल करण्यासाठी, आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मिरवता. तुम्हाला संघटनेचे नेतृत्व करण्याचा कंटाळाआला होता, तर मी संघटनेची धुरा सांभाळण्यास तयार होतो. आमच्यावर जबाबदारी टाकून पाहायचे होते. पण, प्रत्येकवेळा बहुजनांचा चेहरा घेऊन मिरवायचे आणि त्यांना कोणत्याही पदावर संधीच मिळू द्यायची नाही, हा उद्योग आता बंद करा, अशी टीकाही खोत यांनी केली.शेट्टींचा राजकारणाचा व्यवसाय बंद पाडूराजू शेट्टींनी शेतक-यांचे भांडवल करून राजकारणाचा ‘व्यवसाय’ चालू केला आहे. याला माझा विरोध होता, म्हणूनच त्यांनी माझी संघटनेतून हकालपट्टीकेली आहे. पण, यापुढे त्यांचा राजकारणातील आणि संघटनेतील साखरसम्राटांबरोबरचा ‘व्यवसाय’ बंद पाडण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोतयांनी दिला.शरद जोशींनी हकालपट्टी केली, तेव्हा तुम्ही गद्दारी केली होती का?शेतकरी संघटनेतून शरद जोशींनी तुमची हकालपट्टी केली, तेव्हा तुम्ही गद्दारी केली होती का? जोशींनी भाजपाबरोबर युती केली म्हणून त्यांच्यावरटीका करून तुम्ही स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यावेळी तुमचा आत्मसन्मान कोठे गेला होता? कोल्हापुरात भाजपाबरोबर, सांगलीत काँग्रेस आणिनाशिक, पनवेलमध्ये शिवसेनेबरोबर युती-आघाड्या करता आणि तत्त्वाची भाषा आम्हाला शिकविता काय, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला.