शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजना पूर्ण होऊनही पालिका घेते एमआयडीसीचे पाणी

By admin | Updated: January 7, 2015 23:23 IST

योजनेची कामे अपूर्ण : मळे भागातील नागरिकांना कूपनलिकांचाच आधार; अशुद्ध पाण्याचाही प्रश्न गंभीर

महालिंग सलगर - कुपवाडसह उपनगरांना भेडसावणारी पाणीटंचाई शहरात पाणी योजना झाल्यावर बऱ्यापैकी कमी झाली. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट थांबली. परंतु, रखडलेल्या जलशुध्दीकरण केंद्राअभावी अजूनही म्हणावे तसे शुध्द आणि मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात कूपनलिकांवर, तर काही भागात एमआयडीसीच्या महागड्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ असेच चित्र आहे. महापालिकेत समावेश झाल्यावर कुपवाडसह उपनगरांना सांगली, मिरज शहरांप्रमाणे मुबलक पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा होती. त्याबाबत लोकप्रतिनिधी आणि शासनानेही विकासाचे गाजर दाखविले होते. योजनाही तयार करण्यात आली. परंतु, कुपवाडवासीयांची तहान महापालिकेच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनी भागली. कुपवाडसह उपनगरांसाठीची पाणी योजना झाल्यावर नागरिकांना कृष्णेचे मुबलक पाणी मिळू लागले. परंतु,वारणेच्या पाण्याविषयी लोकप्रतिनिधींनी कुपवाडवासीयांना दाखविलेले स्वप्न अधुरेच राहिले. वारणेच्या पाण्याविषयीची घोषणा हवेत विरली. परंतु, महाआघाडीने निवडणुकीत केलेल्या घोषणेप्रमाणे शहरात बऱ्याच भागात पाणी पोहोचवून, दिलेला शब्द पाळला. त्यामुळे टंचाई बऱ्यापैकी संपली. काही भागात मात्र अजूनही योजनेचे पाणी मिळत नाही. आलिशान कॉलनी, कोंडका मळा, गणे मळा, आनंदनगर, विवेकानंद कॉलनी आदी भागासह काही उंचावर असलेल्या उपनगरांत अजूनही योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. आनंदनगर, विवेकानंद कॉलनी परिसरासह प्रभाग चोवीसच्या काही भागात अजूनही एमआयडीसीकडून महागड्या दराने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये वाया जातात. आलिशान कॉलनीसह मळे भागाला कूपनलिकांवरच तहान भागवावी लागत आहे. या पाणी योजनेंतर्गत करण्यात येणारे जलशुध्दीकरण केंद्राचे कामही ठप्प आहे. त्याची गती निधी मिळाला नसल्यामुळे मंदावली आहे. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यावर शहराला पूर्ण दाबाने एकाच सत्रात पाणीपुरवठा करणे सोपे जाईल, असे प्रशासन म्हणते, तर कामांची गती मंदावत ठेवून ठेकेदार दर वाढवून घेत आहेत. त्यामुळेच नागरिकांना एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागत आहे. प्रशासनाने जलशुध्दीकरण केंद्र व योजनेची कामे त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे. योजनेची कामे गतीने करू -गिरीबुवानागरिकांना २०४० पर्यंत पाणीपुरवठा होईल, त्यादृष्टीने पाणी योजनेची कामे केली आहेत. ८० कोटींची योजना उशिरा सुरू झाल्यामुळे गतीने होऊ शकली नाही, हे खरे आहे. जवळजवळ सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. आठ टाक्या व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. निधीची अडचण आहे. जलशुध्दीकरण केंद्राचे काम व उर्वरित काही कामांना येत्या पंधरा दिवसांत १६ कोटींचा फरक मिळाल्यावर गती देऊ, अशी माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता जे. व्ही. गिरी यांनी दिली. शहरातील गावभागात अजूनही बऱ्याच ठिकाणी जुन्याच वाहिन्या टाकल्या आहेत. टाक्या पूर्ण झाल्या असल्या, तरीही काही कामे अपूर्ण आहेत. वाहिन्यांचे नकाशेही व्यवस्थित नाहीत. महाआघाडीच्या कालावधित सर्व गोंधळ झाला आहे. कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. परंतु, काही उपनगरे व मळे भाग अजूनही पाण्यापासून वंचितच राहिला आहे. हा गोंधळ संपवून शहरवासीयांना मुबलक व शुध्द पाणी देण्यासाठी यापुढील कालावधित प्रयत्न करणार आहोत.- गजानन मगदूम, नगरसेवक