शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पक्व झालेली डाळिंबे पडून फुटू लागली

By admin | Updated: January 9, 2015 00:10 IST

परिस्थिती ‘जैसे थे’ : बाजारात आणलेली कचऱ्यात गेली; उत्पादक चिंताग्रस्त

अविनाश बाड - आटपाडी -पक्व झालेली डाळिंबे दर वाढेल, या आशेने शेतकरी तोडायला तयार नाहीत. १०० ते १५० रुपये किलो दराने जाणारी डाळिंबे सध्या ४० ते ५० रुपयांच्या घरात आहेत. पक्व झालेली डाळिंबे आता आपोआप झाडावरून जमिनीवर पडून फुटत आहेत. त्यातच डाळिंबाचा ज्यूस आणि अनारदाना निर्मिती अन्न आणि भेसळ विभागाने छापे टाकून बंद केली आहे. बाजार समितीत पदरमोड करून शेतकऱ्यांनी डाळिंबे आणली तर, तिथे कचऱ्यात फेकून द्यावी लागत आहेत. पडलेल्या दरामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करताना दिसत नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पंधरा दिवसांपासून डाळिंबाच्या बागा पक्व होत आहेत. तालुक्यातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा विक्रमी उत्पादन आले आहे. तेल्या, अवकाळी पाऊस यासह ढगाळ हवामानाचा परिणाम झाल्याने त्याचा डाळिंबावर परिणाम झाला आहे.डाळिंब हे हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक. त्यामुळे जरी तेल्या रोग आला तरी, त्यावर महागड्या कीडनाशक, बुरशीनाशक औषधांच्या डझनाने फवारण्या करून आणि महागडी खते घालून चांगल्या दराच्या आशेने शेतकरी डाळिंबाचे उत्पादन घेतात. भरपूर पैसे मिळतील, या आशेने उत्पादनावर शेतकरी कर्ज काढून खर्च करत आहेत.यंदा मात्र डाळिंबाचा दर ४० ते ५० रुपयांवर चढायला तयार नाही. ४ ते ५ प्रतीमध्ये डाळिंबाची विभागणी केली जाते. पहिल्या, दुसऱ्या क्रमांकाच्या डाळिबाची किलोवर, तर इतर क्रेटवर १० ते १०० रुपयांपर्यंत येथील बाजार समितीच्या सौद्यात विकली जात आहेत. म्हणजे अगदी प्रतिकिलो ५० पैसे, ५ रुपये किलो असा शेतकऱ्यांना दर मिळत आहे. याशिवाय उरलेली डाळिंबे तर फेकून दिली जात आहेत.लवकरच बैठक घेऊ आणि व्यापारी, अडतदारांना सूचना देऊ, शिवाय शासनाला ज्यूस, अनारदाना निर्मिती बंद झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे कळवू, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस. यु. जाधव यांनी सांगितले, तर डाळिंबे मोठ्या प्रमाणात विक्रीला येण्याच्या पार्श्वभूमीवर केवळ हप्तेखोरीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकून उद्योग बंद केल्याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे.माझी डाळिंबाची ७०० झाडे आहेत. गेली १५ दिवस मी दर वाढायची वाट पाहात आहे. आता डाळिंबे आपोआप जमिनीवर गळून पडायला लागली आहेत. १५-२० दिवसांपासून एकही व्यापारी बागेकडे फिरकला नाही. व्याजाने पैसे काढून मी जागेवर २ लाख रुपये खर्च केले आहेत. गेल्यावर्षी ११० रुपये किलोने डाळिंबे विकली. यंदा ५० रुपयानेही कुणी मागेना. पडलेली २५ क्रेट डाळिंबे आणली. एक क्रेट २५ रुपयालाही जाईना.- किसन मोटे, शेतकरी बोंबेवाडीयापूर्वी ८० टक्के डाळिंबे निर्यात होत होती; पण आता केंद्र शासनाने जाचक अटी घातल्याने डाळिंब निर्यात होत आहेत. त्याचा दरावर परिणाम झाला आहे. देशात स्वस्ताई करण्याचा नादात शासनाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे. ज्यूस आणि अनारदाना निर्मिती बंद असल्याने शेतकऱ्यांना डाळिंबे फेकून द्यावी लागत आहेत.- पंढरीनाथ नागणे,अडतदार, मंगलमूर्ती फ्रूट सप्लायरपाच वर्षांपासून आटपाडीत येऊन येथील डाळिंबे खरेदी करून दिल्ली, लखनौ यासह देशात अनेक भागात पाठवितो. यंदा उत्तरेत थंडीचा कडाका असल्याने डाळिंबांना मागणी कमी आहे. त्या तुलनेत आवक खूप वाढली आहे. त्यामुळे दर कमी आहे; पण शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांना डाळिंबे कचऱ्यात फेकावी लागत आहेत. - शमीम अहमद,डाळिंब व्यापारी, लखनौ