मोर्चाची सुरुवात मल्लिकार्जुन देवालयापासून करण्यात आली. मोर्चा शहरातील मुख्य चौकातून नगरपंचायत नगरपंचायत चौकात आला. त्यांनतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी हायुम सावनूरकर म्हणाले. नगरपंचायतीचे सत्ताधारी आणि प्रशासन हे शहरातील नागरिकांविरोधात काम करीत आहे. कोरोनाच्या महामारीत जनतेची आर्थिक स्थिती खालावली आहे. असे असताना विविध कर वाढवण्याचा घाट सुरू आहे. याचा आम्ही निषेध करतो.
यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, वैभव बोगार, रणजित घाडगे, अमोल व्हनखडे यांची भाषणे झाली.
मोर्चात शहरातील पेयजल योजनेची चौकशी झाली पाहिजे, नगरपंचायतीच्या दुकानगाळ्यांचे वाढविलेले भाडे व अनामत रक्कम कमी करावी, नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा. अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष मोरे यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चास कॉंग्रेसचे राजाराम घोरपडे, किसान सभेचे गवस शिरोळकर, दिगंबर कांबळे, ‘आरपीआय’चे बाळासाहेब माने, दयानंद सगरे, अजित भोसले, अजम मकानदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
पंधरा दिवसात बैठक
यावेळी नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विशाल वाघमारे यांनी आंदोलक व नगरपंचायत प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. येत्या १५ दिवसांत या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी नगर पंचायतीमध्ये व्यापक बैठक लावण्याचा शब्द दिला.
फाेटाे : ०८ केएम १