शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या मुख्य कालव्याची दुरवस्था

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

जागोजागी गळती : दोन्ही बाजूंनी भगदाडे, अस्तरीकरणाची मागणी

नरवाड : मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला अस्तरीकरण करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्र. २ पासून मुख्य कालव्याव्दारे ६ टप्प्याने कवठेमहांकाळ तालुक्याला पाणी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.वीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नरवाड (ता. मिरज) येथे दुसरा टप्पा करण्यात आला. येथे वितरण हौद बांधून पाणी मुख्य कालव्याव्दारे सलगरेपर्यंत वाहून नेण्यासाठी सिमेंटमध्ये दगडी बांधकाम करण्यात आले. मुख्य कालवा साधारणत: १५ फूट खोल आणि १५ फूट रुंदीचा तयार करण्यात आला.सद्यस्थितीत कालव्याचा २० टक्के भाग बांधकामाचे निसटलेले दगड आणि वहात आलेले खडक यांनी भरला आहे. याची जाणीव असूनही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे. म्हैसाळ प्रकल्पाचे सध्या आवर्तन बंद असून, किमान यावेळी तरी अस्तरीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. कालव्याला अस्तरीकरण नसल्याने शेकडो हेक्टर जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणाअभावी लाखो लिटर पाणी प्रकल्पातून झिरपून पुन्हा नदीला मिळत आहे. मुख्य कालव्याच्या वितरण हौदात पडणारे पाणी आणि सलगरे येथील पोहोचणारे पाणी मुरत आहे. परिणामी दुष्काळी कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी यामुळे मृगजळ ठरणार आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यांचे दुर्लक्षमुख्य कालव्याच्या बांधकामावेळी ठेकेदार आणि तत्कालीन अधिकारी यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून उपलब्ध सिमेंटमध्येच कालव्याचे बांधकाम उरकले. यामुळे मुख्य कालव्याचे बांधकाम ढासळू लागले आहे. सद्यस्थितीत कालव्याचा २० टक्के भाग बांधकामाचे निसटलेले दगड आणि खडक यांनी भरला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे.