शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पोषण आहारासाठी किडके कडधान्य

By admin | Updated: December 21, 2014 00:42 IST

मिरज तालुक्यातील प्रकार : संतप्त पालकांची ठेकेदारावर कारवाईची मागणी

अण्णा खोत ल्ल मालगावमिरज तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत किडलेल्या व सडलेल्या हरभऱ्याचा पुरवठा करण्यात आल्याने पालक संतप्त झाले आहेत. निकृष्ट कडधान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचा ठेका रद्द करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी व पालकांतून होत आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरदृष्टी ठेवून केंद्र शासनातर्फे शालेय पोषण आहार योजना राबविण्यात आली आहे. मध्यान्ह भोजन म्हणून ओळखली जाणारी ही योजना अधिकाऱ्यांचा अशीर्वाद व पुरवठादार ठेकेदाराच्या स्वार्थी वृत्तीने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घाला घालणारी ठरू लागली आहे. शालेय पोषण आहारासाठी तांदूळ, तेल, चटणीसह मसाले पदार्थ व कडधान्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. भातात दरदिवशी वाटाणा, तुरडाळीबरोबर हरभरा हे वेगवेगळी कडधान्ये वापरली जातात. दहा दिवसांपूर्वी प्राथमिक शाळांमध्ये हरभरा पुरवठा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनात वापरण्यात येणारा हा हरभरा पाहून पालक संतप्त झाले. किडलेल्या व सडलेल्या हरभऱ्याचा पुरवठा करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचा हरभरा वापरण्यास शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शालेय पोषण आहाराच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारी करूनही निकृष्ट वस्तूंचा पुरवठा सुरूच आहे. शालेय पोषण आहार नियंत्रणासाठी पंचायत समितीमध्ये स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन पोषण आहाराच्या वस्तूंचा दर्जा तपासला जात नाही. मुख्याध्यापकांकडून येणाऱ्या अहवालावर कार्यालयात बसूनच माहिती गोळा करण्याचे काम अधिकारी पार पाडत असल्याची तक्रार आहे. हरभऱ्या बरोबर वाटाणा, तेल, चटणी, कडधान्यासह दर्जाहीन वस्तूंचा पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांना बेचव व निकृष्ट आहार निमुटपणे घ्यावा लागत आहे. परिणामी त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती पालकांतून व्यक्त होत आहे. निकृष्ट कडधान्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी पालकवर्गातून मागणी होत आहे.