शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

आटपाडीची ओळख ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी व्हावी !

By admin | Updated: August 4, 2016 01:27 IST

अमरसिंह देशमुखांची तळमळ : खेबूडकर कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन; तालुक्यात पाणी व्यवस्थापनाची गरज

अविनाश बाड -आटपाडी--प्यायला पाणी नाही, कायम दुष्काळी परिस्थिती, ओळखच दुष्काळी भाग अशी. तसेच जगण्यासाठी गोदीमध्ये जाऊन काम करणारी, मेंढरं घेऊन कोकणामध्ये जाणारी आणि वर्षानुवर्षे ऊस तोडायला जाणारी माणसं, ही तालुक्याची दुसरी ओळख. पण येत्या पाच वर्षात ही ओळख पुसायची आहे. हिरवा तालुका आणि अधिकाऱ्यांचा तालुका अशी नवी ओळख निर्माण करणे आपले स्वप्न आहे, अशी तळमळ रविवारी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी जाहीरपणे व्यक्त केली. इथल्या नेत्यांची स्वप्नं बदलू लागली, तालुक्याचं चित्र बदलेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथील दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून बांधलेल्या आबासाहेब खेबूडकर ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या इमारतीचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. वास्तविक अवघ्या महिन्यापूर्वी आटपाडीत माजी मंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याहस्ते पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाची इमारत तयार असताना आणि महाविद्यालयाच्या आवारातच कार्यक्रमाचे आयोजन केलेले असताना, त्यावेळी उद्घाटन करण्यात आले नाही. त्यासाठी रविवारी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर राजकारणी मंडळी असूनही राजकारणविरहित केवळ शैक्षणिक आणि तालुक्याची ओळख बदलासाठीची घोषणा होणारा हा तालुक्यातील पहिला कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आटपाडीतील स्वागताचा हा माझा शेवटचा कार्यक्रम समजा. मी या तालुक्यातील तरुणांना युपीएससी आणि एमपीएससीसाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहे. अमरसिंह देशमुख यांच्या तळमळीची त्यांनी प्रशंसाही केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहारला मागे टाकणारी अधिकाऱ्यांची संख्या आपण आटपाडी तालुक्यातून निर्माण करू. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, टेंभूचे पाणी आले म्हणून केवळ विकास होणार नाही, त्याचे नियोजन हवे. दिशा देणाऱ्या नेत्याची गरज आहे. देशमुखांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून तलावातून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीने शेती करण्यासाठी गेले वर्षभर रान उठविले आहे. आटपाडी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे उताराची आहे. जागोजागी सर्वच तलाव बांधले आहेत. ओढ्याने जरी ‘टेंभू’च्या पाण्याने तलाव भरले आणि पाण्याची आवर्तने ठरविली तर, सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीमुळे तालुका हिरवागार होेण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातली सर्वात मोठी शिक्षण संस्था त्यांच्याकडे आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळाला, संधी मिळाली, तर हे स्वप्न सत्यात उतरणे शक्य आहे. मात्र या मंडळींना त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणात राजकारणाचा अडसर येणार काय?पुण्या-मुंबईसह आटपाडीत शिकून शहरात स्थायिक झालेले अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी रविवारी येथे आल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून ते आटपाडीचे वाटतच नव्हते. यातील ज्येष्ठ मंडळींना स्वत: खुर्ची उचलून देताना हर्षवर्धन देशमुखही दिसले. त्या मंडळींचं एवढंच म्हणणं होतं की, आटपाडीत शिक्षणाची सोय झाली नसती, तर आम्ही शहरात दिसलो नसतो. आता सामूहिक ठिबक सिंचनला परवानगी न देण्यात राजकारण आहे म्हणतात. मग स्पर्धा परीक्षेमध्येही अडसर निर्माण होणार काय? आणि देशमुख त्यावर कशी मात करणार? यावर स्वागतार्ह स्वप्नाचे भवितव्य अवलंबून आहे.