शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरोलीच्या प्रेमीयुगुलाची आग्रा येथे आत्महत्या

By admin | Updated: September 30, 2016 01:30 IST

जिल्ह्यात खळबळ : ताजमहाल पाहून संपविली जीवनयात्रा

कवठेमहांकाळ : हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथील अयोध्या दिनकर पाटील (वय १६) व झाकीर दिलावर मुजावर (१७) या अल्पवयीन प्रेमीयुगुलाने नवी दिल्लीपासून दोनशे किलोमीटरवरील उतर प्रदेशमधील आग्रा येथे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. गेल्या चार दिवसांपासून हे प्रेमीयुगुल बेपत्ता होते. आग्रा येथील ताजमहाल पाहिल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांची अयोध्या ही मुलगी आहे. गेल्या वर्षभरापासून तिचे झाकीर मुजावर याच्याशी प्रेमसंबंध होते. अयोध्या व झाकीर हरोली गावात एकाच गल्लीत राहत होते. अयोध्याला तिचे घरचे लोक ‘सोनालिका’ म्हणत, तर झाकीर तिला ‘सोनाली’ या नावाने बोलवत असे. ती सध्या दहावीत, तर झाकीर बारावीत शिकत होता. दोघांच्या विवाहास मुलीच्या घरच्यांचा विरोध होता, त्यामुळे त्यांनी पळून जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी त्यांनी गावातून पलायन केले होते. दिनकर पाटील यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. पोलिस तपास सुरू होता; पण दोघांचा कोठेही सुगावा लागत नव्हता. घरचे लोक शोध घेत असल्याची कुणकुण लागल्याने दोघांनी भीतीने आग्रा येथे बुधवारी रात्री धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी कवठेमहांकाळ पोलिसांचे एक पथक व प्रेमीयुगुलाचे नातेवाईक आग्रा येथे रवाना झाले. दोघांच्या मृतदेहाजवळ एक बॅग सापडली. या बॅगेत दैनंदिन वापरातील साहित्य मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिलेली नाही. दोन छायाचित्रे मिळाली आहेत. यामध्ये दोघेही ताजमहालसमोर उभे असल्याचे दिसत आहे. याच ताजमहालमध्ये शहाजहान व त्याची पत्नी मुमताज यांची कबर आहे. छायाचित्रामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नाही. छायाचित्रे काढताना दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्यांनी ही छायाचित्रे सायंकाळच्या सुमारास काढल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याचे शहादरा पोलिसांनी सांगितले. बुधवारी रात्री आग्रा स्थानकावरील काही प्रवाशांना त्यांचे मृतदेह पडल्याचे दिसून आले. आत्महत्या केलेले हे ठिकाण निर्जन असून, ताजमहालपासून जवळच आहे. तेथे जाण्यास मोठा रस्ता नसल्याने पायवाटेने चालतच जावे लागते. या घटनेने जिल्ह्णात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)चौकट...पथक रवानाआत्महत्येचा गुन्हा शहादरा पोलिस ठाण्यात नोंद आहे. तेथील पोलिसांनी या घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. येथून गुरुवारी सकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम, हवालदार भगवान नाडगे, राकेश पाटील यांचे पथक आग्ऱ्याकडे रवाना झाले आहे. दोघांचे मृतदेह शुक्रवारपर्यंत आणले जाणार आहेत.मिठी मारून जीवन संपविले!आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती, असे घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिसांना दिसून आले आहे. आत्महत्या करताना त्यांना कोणीही पाहिले नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. रेल्वे गेल्यानंतर दोघांचे मृतदेह तेथे पडल्याचे काही प्रवाशांना दिसून आले. त्यानंतर प्रवाशांनी पोलिसांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. ताजमहाल पाहण्याची इच्छा : आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल एकत्रित पाहण्याची इच्छा व्यक्त करून, अयोध्या आणि झाकीर चार दिवसांपूर्वीच घरातून बाहेर पडले होते. शहादरा पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता, दोघेही पहिल्यांदाच आग्रा येथे आल्याचे सांगितले.