शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

उमदीसह ४२ गावांतील शेतकऱ्यांचा सांगलीत ठिय्या

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

खासदार, आमदारांची ग्वाही फोल : आंदोलकांनी नेत्यांना सुनावले खडे बोल; संघर्ष सुरूच राहणार

सांगली : जत पूर्व भागातील ४२ गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी सुरू केलेली उमदी ते सांगली पदयात्रा सहा दिवसांनंतर सोमवारी सांगलीत पोहोचली. गावकऱ्यांनी येथे येताच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले. काही राजकीय नेत्यांनी आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र्यांकडून लेखी आश्वासन घेऊन यावे, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. परिणामी ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. जत पूर्व भागातील उमदीसह ४२ गावे ३२ वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत होरपळत आहेत. या गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करून शेतीला पाणी द्यावे किंवा सरकारने कर्नाटकात जाण्याचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी आहे. त्यासाठी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, दावल शेख, निवृत्ती शिंदे, संजय तेली, राजू चव्हाण, मल्लिकार्जुन सुरगोंड, मानसिध्द शिरगट्टी, संगू गवळी, रोहिदास सातपुते, चिदानंद आवटी, संतोष गुरव, हरिष शेटे, भीमू नागोंड, काशिलिंग बिराजदार, चंद्रकांत नागणे, महंमद कलाल यांच्या नेतृत्वाखाली दि. १ जुलै रोजी ग्रामदैवत मलकारसिध्दाचे दर्शन घेऊन उमदी ते सांगली पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. ही पदयात्रा सोमवारी सांगलीत दाखल झाली. येथील पुष्पराज चौकात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे आदींनी पदयात्रेचे स्वागत केले. खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. आंदोलकांच्या धास्तीने तेथे पोलीस बंदोबस्त मोठ्याप्रमाणात ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन झाले. यावेळी खा. पाटील म्हणाले की, दुष्काळी जत तालुका आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनुशेषामुळे म्हैसाळ योजनेस निधी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरीही विशेष निधी देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार आहे. दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रश्न सोडवू. आता आंदोलन मागे घ्यावे. शेतकऱ्यांचा ३२ वर्षे पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. म्हैसाळ योजनेसाठी तीनशे कोटींचा निधी दिला, तर १२० गावांचा कायमचा प्रश्न सुटणार आहे. शेतकरी कर्नाटकमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शासनाकडे पाठपुरावा करून जत पूर्व भागातील शेतीला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनास थोडा वेळ देण्याची गरज असून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे विलासराव जगताप यांनी सांगितले. आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर रेश्माक्का होर्तीकर, खा. पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आ. जगताप, आ. खाडे, सुरेश शिंदे, प्रभाकर जाधव, शेखर इनामदार, आकाराम मासाळ, संजीवकुमार सावंत, सुशिला होनमोरे, जतचे उपनगराध्यक्ष उमेश सावंत, प्रकाश जमदाडे, रमेश साबळे आदींनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, आंदोलकांच्या तीव्र भावना असल्याचे चोवीस तासात सरकारकडे कळविण्यात येईल. शिष्टमंडळाने आंदोलक आणि पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांना बैठकीतील वृत्तांत सांगितला. आंदोलन मागे घेणार असाल तर जिल्हाधिकारी गायकवाड येथे येऊन मागण्यांबाबत आश्वासन देण्यास तयार आहेत. तुमची ती तयारी आहे का?, असा प्रश्न खा. पाटील व जगताप यांनी विचारला. यावेळी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. खासदार, आमदारांनी मुंबईला जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची विनंती सुनील पोतदार यांनी केली. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नसल्याचे आंदोलकांनी ठणकावून सांगितले आणि बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)