शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

बाजार समितीत शासकीय बाजार

By admin | Updated: August 11, 2014 00:16 IST

प्रकल्प ठप्प : दोन वर्षांपासून प्रशासक नियुक्त; नियंत्रणाची केवळ औपचारिकता

अंजर अथणीकर-- सांगली -- सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पावणेदोन वर्षापासून प्रशासक नियुक्त केल्यामुळे दैनंदिन कामकाजाबरोबर मंजूर व सुरू झालेली कामे ठप्प झाली आहेत. सरकारी रंगात बाजार समितीचा कारभार रंगल्याने समितीचे अस्तित्वच हरवून गेले आहे. प्रशासकांच्या डोईवरही अन्य संस्थांचा भार असल्यामुळे त्यांनाही आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. वैभव पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना गैरव्यवहाराचा आरोप करुन कृषी उत्पन्न बाजार समिती १६ जानेवारी २०१३ मध्ये बरखास्त करण्यात आली. यावर प्रशासक म्हणून मिरज सहकारी संस्था उपनिबंधक मनोहर माळी यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून चारवेळा प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली. एप्रिलमध्ये प्रशासकाचा कालावधी संपला होता, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी प्रशासकाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यांची मुदत आता सप्टेंबर २०१४ मध्ये संपणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे म्हणाले की, प्रशासक हा शासकीय चाकोरीबध्द पध्दतीने काम करणारा असतो. लोकप्रतिनिधी हा लोकांना जबाबदार असतो. त्याला लोकोपयोगी कामे करावी लागतात. संस्थेच्या कामामध्ये लोकांच्या कामांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. लोकशाहीमध्ये दोन वर्षे संस्था प्रशासकाच्या ताब्यात असणे हे मारक आहे. या कामांना बसला फटका ४प्रशासकीय कारभार सुरू असल्यामुळे एकीकडे चाकोरीबध्द कारभार सुरू असताना दुसरीकडे लोकोपयोगी कामांसाठी पाठपुराव्याचे काम थांबले आहे. ४कारभारात राजकीय हस्तक्षेप थांबला असला तरी, सार्वजनिक उपक्रमही थांबले आहेत. ४दोन वर्षापूर्वीच ५० ते ६० लाख रुपये खर्चून जतमध्ये धान्य प्रोसेसिंग युनिटचे काम पूर्ण झाले आहे. याचा वापर प्रशासकीय कारभारामुळे आता थांबला आहे. ४जतमधील सांस्कृतिक भवन ४० लाख रुपये खर्चून तयार झाले असताना, आता फरशी व रंगरंगोटीचे काम थांबले आहे. ४कवठेमहांकाळमधील बेदाणा प्रकल्प उभारण्याचेही काम रखडले आहे.