शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; पाच तक्रारी दाखल, आठवड्यात निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

सांगली : सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार कोरोना काळात वाढत ...

सांगली : सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार कोरोना काळात वाढत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

जिल्हा पोलीस दलात स्वतंत्र सायबर सेल सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत असत. गेल्या पाच महिन्यांत सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक करण्यापासून बनावट अकाऊंटच्या ५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. काही तक्रारींबाबत चाैकशी सुरू आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणे, व्हाॅट‌्सॲपचे अकाऊंट हॅक करणे या तक्रारींचा समावेश आहे. तसेच सायबर क्राईमशी संबंधित मे अखेरपर्यंत २६ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यापैकी अनेक तक्रारींवर कारवाई झाली आहे. इतर तक्रारींची चाैकशी सुरू आहे.

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून भावनिक साद घालत पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. फ्रेंड लिस्टमधील सदस्य पैसे पाठवतात. त्यामुळे नुकसान होते. युजर्सनी यामुळे सतर्क राहिले पाहिजे.

चौकट

सात दिवसांनंतर होते खाते बंद

तक्रार केल्यानंतर सात दिवसात खाते बंद होते, असा आजवरचा अनुभव आहे.

सायबर सेलकडे तक्रार आल्यावर पोलीस नोटीस पाठवतात. नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करतात.

परंतु, युजरने स्वत: आपल्या अकाऊंटवरून तक्रार केली तर चोवीस तासांच्या आत बनावट खाते बंद केले जाते.

चौकट

तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...

आपल्या नावाने बनावट अकाऊंट दिसले तर सर्वप्रथम अकाऊंट फेक आहे की हॅक झाले आहे, याची खात्री करावी. घाबरुन न जाता त्वरित सायबर सेलशी संपर्क साधावा.

फेक अकाऊंट युजर स्वत: बंद करू शकतात. युजरने स्वत: रिपोर्ट केले तर चोवीस तासांच्या आत अकाऊंट बंद होते. रिपोर्ट करण्याची प्रोसेस समजून घ्यावी.

फेक अकाऊंटची प्रोफाईल युआरएल लिंक काॅपी करून आपल्या अकाऊंटवरून तक्रार दाखल करावी. त्वरित कारवाई होते आणि अकाऊंट बंद केले जाते.

ही प्रोसेस कंपनीच्या वेबसाईटवर समजून घेता येऊ शकते किंवा सायबर सेलशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडूनही सविस्तर माहिती मिळू शकते.

सायबर सेलमार्फत सूचना

पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हे सध्या या विभागाचे काम पाहत आहेत. क्षीरसागर म्हणाले की, ओटीपी वरून होणारे फ्रॉड यांच्यासोबतच सध्या फेसबुक द्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सदरची फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारणे, अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग न करणे, आपली सेक्युरिटी सेटिंग प्रायव्हेट ठेवणे, कोणत्याही मागणी अथवा भूलथापांना बळी न पडणे आवश्यक आहे.

कोरोना काळामध्ये वाढल्या तक्रारी

कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहेत.

पाच महिन्यांत तब्बल २६ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे सायबर सेल अलर्ट झाला आहे.

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युजर्सनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चौकट

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

२०१७ ३२

२०१८ ४०

२०१९ ३७

२०२१

मेअखेर २६