शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

अवकाळीने बेदाणा उत्पादक देशोधडीला...

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

उत्पादकांना झटका : रॅकवरील जाळ्यांमध्ये पाणी गेल्याने हजारो टन बेदाणा काळा पडण्याची चिन्हे

प्रवीण जगताप - लिंगनूर -आज पहाटेपासून जिल्ह्यातील मिरज पूर्व, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या परिसराला मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. रॅकवरील जाळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने हजारो टन बेदाणा भिजला आहे. तसेच द्राक्षबागांतील बेदाणा निर्मितीच्या हेतूने तयार असलेली द्राक्षेही या अवकाळीच्या तडाख्यात सापडल्याने, बेदाणा रॅकवरील बेदाणे अन् रॅकवर जाणारी द्राक्षेही खराब होणार आहेत. बेदाणा निर्मिती सुरू असलेल्या व शेडवर येऊन पडलेल्या द्राक्षांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे एकरी दोन ते अडीच लाखाचे नुकसान प्रत्येक बेदाणा उत्पादकाचे झाले आहे. हजारो टन बेदाण्याचे व निर्मितीक्षम द्राक्षांचे नुकसान झाले असून, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व तासगाव परिसरातील बेदाणा शेडवरील नुकसानीचा अंदाज करणेही मुश्कील होऊन बसले आहे.मिरज पूर्व भागात सध्या २५ टक्के द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी तयार आहेत, तर २५ टक्के द्राक्षांची रॅकवर बेदाणा निर्मिती सुरू आहे. २१ दिवसात द्राक्षापासून बेदाणे तयार होत असल्याने, मागील २१ दिवसांपासून आजअखेर विविध टप्प्यात असलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, बेळंकी, डोंगरवाडी, संतोषवाडी, सलगरे, जानराववाडी, आरग, सीमावर्ती गावे, डोंगरवाडी, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, बनेवाडी परिसर तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या उत्तर भागातील माळरानावर उभारलेल्या हजारो बेदाणा शेडवरही बेदाणा निर्मिती प्रक्रिया वेगात सुरू आहे. पण कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, नागज, आगळगाव, शेळकेवाडी, चोरोची, घोरपडी, जुनोनी या भागातही मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ, इतकेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, शेडशाळ, आलास या गावांतील द्राक्षेही पूरक वातावरणामुळे बेदाणा निर्मितीसाठी वाहनांतून येथे पोहोचविली आहेत. त्यांची बेदाणा निर्मितीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण मुसळधार, संततधार पावसाच्या सरींमुळे हजारो टन बेदाणा पावसात भिजून खराब झाला आहे. तसेच हा बेदाणा १०० टक्के काळा पडणार आहे.गाऱ्हाणेबेदाण्याचे बेदाणा व निर्मितीक्षम रॅकवरील द्राक्षे संपूर्ण भिजल्याने पूर्ण बेदाणा काळा पडणार आहे. काळा पडलेला बेदाणा कवडीमोल दराने विकला जातो. गतवर्षी २०० ते ३०० रूपये इतका चांगला दर मिळाला होता, तर यंदाही १५० ते १७० रूपये इतका दराचा आकडा सुरू असताना, आता काळा पडलेला बेदाणा चार नंबरचा म्हणून त्याला ३० रूपये किलोचाही भाव मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे एकरी दोन ते तीन लाख रूपयांचे आर्थिक नुकसान आता बेदाणा उत्पादकाला सोसावे लागणार आहे.ज्या बेदाणा उत्पादकांचा तयार बेदाणा काल, शनिवारअखेर कोल्ड स्टोअरेजपर्यंत पोहोचला आहे, त्यांचाच बेदाणा आज अचानक पहाटेपासून झालेल्या पावसापासून नशिबाने वाचला आहे. बाकी सर्व बेदाणा अन् द्राक्षांचा सुपडा साफ होणार आहे.अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या बेदाणा निर्मितीस व बेदाण्यासाठी पिकविलेल्या द्राक्षांना फटका बसला आहे. एकरी दोन ते अडीच लाखाचा फटका बसला आहे. माझा १५ टन माल खटावच्या रॅकवर आहे, तर सुमारे १५ टन द्राक्षे अद्याप बागांमध्ये आहेत. माझ्याप्रमाणेच येथील सर्व बेदाणा उत्पादक देशोधडीला लागले आहेत. मागील दोन वर्षात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपेक्षा हे नुकसान जास्त आहे. - बाळासाहेब व्हणाणावर, बेदाणा उत्पादक, खटाव (ता. मिरज)