शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

द्राक्षांच्या डिपिंगचा खर्च परवडेना!

By admin | Updated: February 10, 2015 23:54 IST

बागायतदार मेटाकुटीला : इलेक्ट्रिक स्टॅटेस्टिक स्पे्रच्या नव्या पर्यायाचा वापर

गजानन पाटील - संख -औषधांचा अपव्यय, मजुरांचा वाढता खर्च, महागडी औषधे, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. जत पूर्व भागात सध्या द्राक्षबागेत द्राक्षघड डिपिंगची कामे सुरू आहेत. डिपिंगचा खर्च मोठा आहे. आता शेतकऱ्यांनी डिपिंगला पर्याय शोधला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिक स्टॅटेस्टिक स्प्रे (इ. एस. एस.) ही यंत्रणा बागायतदारांना सोयीची वाटू लागली आहे. कमी वेळेत अधिक फायद्याची हे यंत्र असल्याने डिपिंगसाठी वापर केला जात आहे.तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. पूर्व भागातील तिकोंडी, संख, करजगी, भिवर्गी, कोंत्यावबोबलाद परिसरामध्ये द्राक्षबागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. हा माल एप्रिल, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात येतोसध्या या द्राक्षबागेत द्राक्षघड डिपिंगची कामे सुरू झाली आहेत. डिपिंग म्हणजे द्राक्षघड जीब्रॉलिक अ‍ॅसिड (जीए) या संप्रेरकाच्या द्रावणात बुडवले जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते.ऊसतोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाले आहे. द्राक्षबागेतील मजुरीचे दर हे बागेतील एकरी द्राक्षवेलीच्या संख्येवर ठरत आहेत. यावर्षी सरासरी ४ रुपयापासून ते ७ रुपये एक झाड असा डिपिंगचा दर आहे. तसेच डिपिंगसाठी मजुरी २०० रुपये आहे. एक मजूर दिवसात २५ झाडांचे घड डिपिंग करतो.एकरी झाडांची संख्या दोन द्राक्षवेलीतील अंतरावर ठरते. ९५० पासून १८०० पर्यंत एका एकरात द्राक्षवेली असतात. डिपिंगचा खर्च मोठा असतो. त्यावर आता द्राक्ष बागायतदारांनी पर्याय शोधला आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिक स्टॅटेस्टिक स्प्रे. पूर्णपणे अमेरिकन बनावटीची ही यंत्रणा शेतकऱ्यांना सोयीची वाटू लागली आहे.सध्या संख, तिकोंडी, भिवर्गी, करजगी परिसरामध्ये इ.एस.एस.चे नागठाणे (ता. वाळवा) येथील स्प्रे करणारे ट्रॅक्टर आहेत. तासगाव, पलूस तालुक्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वापर करीत आहेत. परिणामही चांगला दिसून आला आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. यावर्षी प्रथमच स्प्रेचा वापर करीत आहेत. कमी श्रमात, कमी वेळेत आणि एकाचवेळी एकसारखी जीएची फवारणी होते.इ एस एस स्प्रे पंपाद्वारे डिपिंगचे काम लवकर, एकसारखे होते. मजुरांकडून डिपिंग करताना द्रावणात घड चुकून बुडवला जात नाही. त्याचा फटका बसतो. औषधाचीही बचत होते. कमी श्रमात काम होते. चांगले परिणाम दिसून आल्याने यावर्षी पंपाला प्रथम प्राधान्य दिले आहे.- रामेश्वर नलवडेद्राक्ष बागायतदार, संखफवारणी दर एकरी अडीच हजारइ एस एस स्प्रे करणाऱ्या एका युनिटची किंमत (ट्रॅक्टर वगळता) १६ लाख रुपये इतकी आहे. सध्या एकरी अडीच हजार रुपये इतका फवारणीचा दर आहे. या पंपाद्वारे फवारणीसाठी केवळ ३५ ते ४० लिटर द्रावण लागते. मजुरांकडून डिपिंंग करण्यासाठी ५०० लिटर पाणी लागते. एस. एस. पंपाद्वारे पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आकार ३० मायक्रॉन इतका सूक्ष्म असतो.