शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर-पुणदी योजना पूर्णत्वाकडे

By admin | Updated: July 16, 2014 23:41 IST

जुलैअखेर चाचणी : तासगाव पूर्व भागाला लाभ

मांजर्डे : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी गावांना शेतीच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या विसापूर-पुणदी उपसा योजनेचे काम पूर्णत्वास आलेले आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेची चाचणी घेण्याची तयारी करण्यात येत आहे. या योजनेतील पूर्ण पाईपलाईन, सर्व पंपगृहे, तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर तासगाव पूर्व भागातील गावांना लाभ होणार आहे. तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी असणारी ही एक अद्ययावत योजना आहे व अतिशय जलदगतीने ही योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. टेंभू योजनेंतर्गत असणारी विसापूर व पुणदी उपसा सिंचन योजना ही शेतीच्या पाण्यासाठी दुष्काळी भागासाठी एक नवसंजीवनी ठरणार आहे. या भागातील दुष्काळ हटविण्यासाठी ही एक चांगली सिंचन योजना असणार आहे. सातारा जिल्ह्यातील टेंभू, धोम व कण्हेर या धरणांचे पाणी या योजनेतून पेड, सिध्देवाडी या तलावात येऊ शकते. टेंभू योजनेतील तासगाव तालुक्यासाठी राखीव असलेले पाणी आरफळ कालव्यातून आणले जाणार आहे व या योजनेतून बंद जलवाहिनीद्वारे पूर्व भागातील गावांना दिले जाणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. या योजनेसाठी जवळपास ३५0 कोटी रुपये खर्च झाले आहेत.विसापूर उपसा सिंचन योजनेत १३ गावांचा समावेश आहे, तर पुणदी उपसा योजनेत १३ गावांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून पूर्व भागातील २६ गावांतील ७७0 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेतून सर्वात जास्त हातनूर, तर सर्वात कमी लाभ ढवळी या गावाला होणार आहे. टेंभू योजनेतून २ टीएमसी पाणी या योजनेसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच उरमोडी, तारळी धरणातील पाणी या योजनेसाठी उपलब्ध होणार आहे.या योजनेला जून २0११ मध्ये शासनाने तत्त्वत: मान्यता दिली होती. या योजनेचा प्रारंभ जानेवारी २0१३ मध्ये करण्यात आला होता. गेल्यावर्षी सुरू असलेले काम अवघ्या सोळा महिन्यात पूर्णत्वास आलेले आहे. सर्व पंपगृहाची कामे पूर्ण झाली आहेत. विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. ३० जुलैपर्यंत या योजनेची चाचणी घेण्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)विसापूरअंतर्गत येणारी गावेगावाचे नाव क्षेत्र हेक्टरमध्येहातनूर१0१४आरवडे६१५हातनोळी६0६गोटेवाडी४८६मांजर्डे४७२विसापूर४३२पेड२४८धामणी१६७पाडळी १५८गौरगाव१५२वंजारवाडी२५ढवळी७बोरगाव२६पुणदीअंतर्गत येणारी गावेगावाचे नाव क्षेत्र हेक्टरमध्येसावर्डे६१0मणेराजुरी६१0पुणदी४८९बस्तवडे३८९बलगवडे३६२खुजगाव२0५डोर्ली१८७वाघापूर१५२कौलगे११६योगेवाडी१0३भैरववाडी७३चिंचणी२६लोटे गणेशवाडी२१