शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

लगोडबंद विहीर आष्टेकरांसाठी वरदान

By admin | Updated: April 30, 2016 00:51 IST

नूतनीकरण सुरू : शिवकालीन इतिहासाचा ठेवा; १९७२ च्या दुष्काळाची साक्षीदार

सुरेंद्र शिराळकर --- आष्टा -येथील पुरातन अशा लगोडबंद विहिरीच्या नूतनीकरणाचे काम आष्टा नगरपालिकेने सुरू केले आहे. अल्पसंख्याक आयोगाच्या अनुदानातून दहा लाख रुपये खर्चून ऐतिहासिक अशा या विहिरीचे पुन्हा बांधकाम सुरू झाल्याने आष्ट्याचा शिवकालीन वारसा जपला जात आहे. या विहिरीचे पाणी सोमलिंग तलावात सोडून तेथे बगीचा फुलविण्यात येणार असल्याने, लगोडबंद विहीर पुन्हा आष्टेकरांच्या मदतीला धावून आली आहे.१९७२ च्या दुष्काळातही या विहिरीतील पाण्याने आष्टेकरांची तहान भगविली. मात्र त्यानंतर आष्टा पालिकेने कृष्णा नदीवरून शहराला पिण्यासाठी पाणी आणले. २००७ मध्ये नवीन पाणी पुरवठा योजना झाल्याने प्रत्येकाच्या घरात कृष्णेचे पाणी मिळू लागल्याने, या विहिरीचे पाणी वापरणे बंद झाले. मात्र आष्टा येथील चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवावेळी तसेच काशिलिंग बिरोबाच्या पूजेसाठीही या विहिरीचेच पाणी परंपरागत पद्धतीने वापरले जाते. अतिशय आखीव-रेखील दगडात बांधलेल्या या विहिरीचे बांधकाम ढासळू लागल्याने आष्टा पालिकेने, शेकडो वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्यादृष्टीने अल्पसंख्याक अनुदान आयोगाच्या अनुदानातून या विहिरीचे बांधकाम सुरू केले आहे. ही विहीर आष्टेकरांसाठी वरदान ठरली आहे. माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वीच्या बांधकामानुसार सामग्रीचा वापर करून काम करण्यात येत आहे. कोल्हापूर, बेळगाव येथील कारागीर हा ठेवा जतन करण्याचे काम करीत आहेत. लगोडबंद विहिरीत कायमस्वरुपी जिवंत पाण्याचे झरे असल्याने येथील पाणी कमी होत नाही, काम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीवर कचरा पडू नये, यासाठी जाळी बसविण्यात येणार आहे. या विहिरीतील पाणी विद्युत पंप बसवून सोमलिंग तलावात नेण्यात येणार आहे. आष्ट्याच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या या विहिरीचे पाणी पुन्हा सुरू झाल्याने इतिहासाला उजाळा मिळणार आहे.बारमाही विहीर : धार्मिक कार्याला पाणीआष्टा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हजरत पीर लगोडबंद दर्गा आहे. या ठिकाणीच लगोडबंद विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम तत्कालीन मुस्लिम शासक आदिलशहाने करून दिल्याचे सांगितले जाते. प्राचीनकाळी आष्ट्यातील नागरिक याच लगोडबंद विहिरीचे पाणी वापरत होते. त्याकाळी गावातील सर्वच धार्मिक कार्याला व वर्षानुवर्षे पिण्यासाठी या विहिरीतून पाणी वापरत होते.विहीर आष्टा शहराच्या मध्यवर्ती व सखल भागात असल्याने इतर ठिकाणच्या विहिरींचे पाणी कमी झाले तरी या विहिरीचे पाणी कधीच आटले नाही.ऐतिहासिक विहिरीचे पाणी वापराविना वायाआष्टेकरांची तहान भागविणाऱ्या या विहिरीचे पाणी गेल्या काही वर्षापासून नागरिक वापरत नसल्याने या विहिरीत गवत, गाळ साठला आहे. यामुळे पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या विहिरीला उतरती कळा लागली आहे. विहिरीचा कठडा, बांधकाम पडू लागले आहे.आष्टा येथील शिवकालीन लगोडबंद विहीर.