शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सगळे आमदार तुपाशी, सरपंच मात्र उपाशी..!

By admin | Updated: August 9, 2016 23:54 IST

तुटपुंजे मानधन : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची व्यथा--लोकमत विशेष

अशोक डोंबाळे --सांगली --गावाच्या विकासातील महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या सरपंचांचे महिन्याचे मानधन एक ते दोन हजार असून, जिल्हा परिषद सदस्यांना तीन हजार, तर पंचायत समिती सदस्यांना बाराशेचे मानधन मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांतील या लोकप्रतिनिधींना मानधन वाढीची गरज असताना आमदारांनी केवळ स्वत:चे वेतन दुपटीहून अधिक वाढविले आहे. आमदारांना महिन्याला दीड लाखांचे मानधन मिळणार असून निवृत्तीनंतर ५० हजाराची पेन्शन मिळणार असून, या भूमिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.भारतीय घटनेच्या सातव्या परिशिष्टातील कलम २४६ नुसार आमदाराचे मुख्य काम राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे बनविणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करणे, हे आहे. काळ आणि परिस्थितीला एखादा कायदा नुकसानकारक ठरत असेल, तर असे कायदे रद्द करणे किंवा त्या अनुषंगाने चर्चा करणे, हेही त्यांचे काम आहे. गावातील आणि शहरातील गटारी बांधणे, शौचालय नूतनीकरण, मंंिदराचे शेड बांधणे ही कामे आमदारांची नाहीत. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. शहरासाठी नगरपालिका आणि महापालिकेतील नगरसेवक, तर ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यावर मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावण्याची जबाबदारी आहे. कामे दर्जेदार होतात की नाही यावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. यानुसार बहुतांशी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरपालिका व महापालिकेचे नगरसेवक जबाबदारी पार पाडत असतात. त्यानुसार त्यांचे मानधन असणे गरजेचे आहे. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. दोन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला एक हजार, दोन हजार ते आठ हजार लोकसंख्येच्या गावातील सरपंचाला दीड हजार आणि आठ हजारावर जास्त लोकसंख्येच्या गावातील सरपंचास दोन हजार मानधन मिळते. विशेष म्हणजे सदस्यांना मानधनच नसून दोनशे रुपयांचा बैठक भत्ता आहे. तोही वर्षातून बारा बैठकींसाठीच असतो.उपसरपंचांना कसलेच मानधन मिळत नाही. पंचायत समिती सदस्यांना महिना बाराशे रुपये मानधन आहे. सभापतींना दहा हजार, तर उपसभापतींना आठ हजाराचे मानधन मिळते. जिल्हा परिषद सदस्यांना महिना तीन हजार मानधन मिळते. सर्वसाधारण सभा आणि विषय समितींच्या बैठकीसाठी येणाऱ्या सदस्यांना तीनशे रुपये भत्ता देण्यात येतो. तीस टक्के सदस्यांना एसटी बसनेच प्रवास करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना वीस हजार, उपाध्यक्षांना पंधरा हजार, विषय समिती सभापतींना बारा हजार रुपये मानधन मिळते. सरपंचांनी अनेकवेळा मानधन वाढीचा ठराव करून शासनाकडे पाठविला आहे. उपसरपंच आणि सदस्यांना मानधन सुरू करण्याची मागणीही अनेक दिवसांपासूनची आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणारे आमदार स्वत:चे वेतन मात्र दुपटीहून अधिक वाढवतात. भरमसाट पेन्शन घेतात. त्यामुळे ते तुपाशी, तर सरपंच, उपसरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य मात्र उपाशी, असा प्रकार सध्या दिसून येत आहे. जनआंदोलन करू : भीमराव मानेसरपंच ग्रामीण भागामध्ये तळागाळातील घटकांबरोबर काम करत असतो. आरक्षणामधून संधी मिळालेले अनेक सरपंच असून, त्यांना फिरण्यासाठी दुचाकीही नाही. या सरपंचांचे मानधन केवळ एक हजार ते दोन हजार रुपये आहे. उपसरपंच आणि सदस्यांना तर मानधनच दिले जात नाही. या घटकांचे मानधन वाढविले असते, तर गावाच्या विकासाला आणखी गती मिळाली असती. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास खऱ्याअर्थाने त्यांनी प्राधान्य दिले असते, पण आमदारांनी स्वत:चेच मानधन दीड लाख रुपये करून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. या प्रश्नावर सरपंच व सदस्यांना संघटित करून आमदारांच्या वेतन वाढीविरोधात आंदोलन करू, असा इशारा कवठेपिरानचे माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी दिला.लोकप्रतिनिधींचे भत्तेपदमानधनआमदार१,५०,०००आमदार निवृत्ती वेतन५०,०००दोनवेळा आमदार६०,०००सरपंच१ ते २000उपसरपंचनाहीग्रा. पं. सदस्यनाहीपं. स. सभापती१०,०००उपसभापती८०००सदस्य१२००जि. प. अध्यक्ष२०,०००उपाध्यक्ष१५,०००सभापती१२,०००जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या मानधनामध्ये वाढीच्या मागणीचा ठरावही अनेक सभांमध्ये झाला आहे. परंतु, गेल्या पंचवीस वर्षांत सदस्यांच्या कामाचा विचार करून मानधन वाढविण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.