सांगली : सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून माणिक शिरगुप्पे (रा. गणपती पेठ) यांची ३५ तोळे दागिने ठेवलेली पर्स चोरट्यांनी लांबविली. १७ डिसेंबरला (बुधवार) ही घटना घडली आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ कच्ची नोंद करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. माणिक शिरगुप्पे या डॉ. जे. बी. शिरगुप्पे यांच्या पत्नी आहेत. बुधवारी त्या कोल्हापूरला नातेवाईकांकडे बसने निघाल्या होत्या. यासाठी त्या सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर गेल्या होत्या. चोरीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व दागिने काढून पर्समध्ये ठेवले होते. कोल्हापूरला जाणाऱ्या एसटीत त्या बसल्या. कोल्हापूरला नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर त्यांना पर्स नसल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. त्या तातडीने सांगलीत परतल्या. शहर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी कच्ची नोंद करून घेतली. (प्रतिनिधी)
सांगलीत बसस्थानकावरून ३५ तोळे दागिने लंपास
By admin | Updated: December 21, 2014 00:42 IST