शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

खेड तालुक्यात ग्राम ‘निर्मल’ होईना!

By admin | Updated: November 21, 2014 00:38 IST

दोनच तालुके निर्मल : काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता

श्रीकांत चाळके -खेड -जिल्हाभरात अनेक ग्रामपंचायती निर्मल झाल्या असल्या तरी खेडमध्ये १८ ग्रामपंचापयती शौचालयाविना आहेत. जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल असून, उर्वरित तालुक्यांतील अनेक गावे निर्मल होण्यापासून वंचित आहेत.‘स्वच्छ ग्राम निर्मल ग्राम’ हे घोषवाक्य घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरू केली़ मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेकांनी राजकीय तसेच स्वत:च्या हिताकडेच जास्त पाहिले़ खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत, ही स्थिती गंभीर नसली तरीही राजकीय स्वार्थापोटी हा आकडा तसाच राहणार असल्याने या योजनेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.उघड्या जागेवर शौचास बसणे हे कोणत्याही रोगराईस आमंत्रण देण्यासारखे आहे़ याबाबत अनेकांनी अनेक ठिकाणी जनजागृतीही केली. मात्र, याविषयी किती नागरिक जागरूक झाले, हाच संशोधनाचा विषय बनून राहीला आहे. ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने ही योजना अमलात आणली. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. याचा विचार करून सरकारने या योजनेस मूर्त स्वरूप दिले. साधारणपणे ६ ते ७ वर्षांपूर्वी ही स्थिती गंभीर होती़ आज यामध्ये काही प्रमाणात बदल झाला. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. सरकारी योजनेचा अनेकांनी लाभ घेतला असला तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे़ जिल्ह्यात २० टक्के कुटुंब आजही शौचालयाविना आहेत. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपयांचे अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रूपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने २०२२पर्यंत निर्मल भारत अभियानाअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून या शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींकडून यासाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचा सूर आळविला जात आहे़ जिल्ह्याची स्थितीजिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायती आजही शौचालयाविना आहेत़ तीन लाख ६४ हजार ९८० कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत. हा आकडा काहीसा कमी झाला असला तरी हे प्रमाण नगण्य आहे़ शौचालयाविना असलेली दारिद्र्यरेखेखालील आणि रेषेवरील कुटुंबांची यादीही हजारोंच्या घरात आहे.शौचालयांविना ग्रामपंचायतीअद्याप जिल्हाभरात ८८ ग्रामपंचायती शौचालयाविना आहेत. या गावात शौचालय बाधणी कधी होणार व गावात शौचालयांची गरज तातडीने पूर्ण केली जाणार का? हा प्रश्न आहे.