शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

फेडरेशनच्या माध्यमातून व्यवसायाला बळ

By admin | Updated: July 16, 2015 22:53 IST

गुहागरातील श्रेयस स्वयंसहायता बचत गट. आज या बचत गटाची भरारी वाखाणण्याजोगी आहे.

महिला बचत गटांना मार्गदर्शन मिळाले की, त्यांच्या व्यवसायालाही योग्य दिशा मिळते आणि मग त्याही व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुहागरातील श्रेयस स्वयंसहायता बचत गट. आज या बचत गटाची भरारी वाखाणण्याजोगी आहे. या बचत गटाच्या अध्यक्षा रश्मी पालशेतकर यांच्यासमवेत विचाराने एकत्र आलेल्या महिलांनी २००८ साली श्रेयस स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या सदस्या अध्यक्षा रश्मी पालशेतकर यांच्याबरोबरच मुग्धा जाधव, रूपाली सावंत, प्रगती मोहिते, मुमताज बागवान, सुरेखा सावंत, मोहिनी कदम, रविना कदम, सारिका सावंत आणि प्रेरणा कदम या साऱ्यांनीच त्याला कृतीची जोड देण्याचा निर्धार केला. सुरूवातीला मासिक बचतीपासून बचत गटाच्या कार्याला सुरुवात झाली. अध्यक्ष रश्मी पालशेतकर यांनी अनेक बचत गटांची निर्मिती ग्रामीण भागामध्ये केली होती. त्यामुळे या महिलांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ चांगलाच मिळाला. सुरुवातीला या महिलांनी शेती करण्यास प्रारंभ केला. आधुनिक पद्धतीने भातशेती करताना त्यांना त्यापासून फायदाही चांगला मिळाला. पहिल्याच प्रयोगाने त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक वाढला. त्यानंतर त्यांनी हळदीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. बँकेकडून पाच लाखांचे कर्ज घेतले. त्याचा वापर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी केला. दुग्ध व्यवसायातही या महिला उतरल्या. एक म्हैस घेऊन दुग्धोत्पादनाला सुरूवात केली. म्हशीची देखभाल करणाऱ्या बचत गटातीलच एका गरजू महिलेला मेहनताना दिला. यावरच न थांबता खाद्य पदार्थ बनवून ते विकण्यास सुरूवात केली. जिद्दीला आत्मविश्वास आणि प्रयत्नाची जोड होतीच. त्यामुळे यशही आपोआप मिळत गेले. या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले कोंबडीवडे, मटणवडे, मच्छीफ्राय, उकडीचे मोदक, पुरणपोळी, सोलकढी आदी सारेच पदार्थ कमालीचे लोकप्रिय झाले. सर्व महिलांनी या पदार्थांची फूड फेस्टिवल, कोकण महोत्सव, विविध स्टॉल्स यांच्या माध्यमातून अधिक लोकप्रियता वाढविली. या बचत गटाच्या पदार्थांना बाहेरूनही मागणी वाढू लागली. महिलांचे या विविध व्यवसायातून चांगलेच अर्थार्जन होऊ लागले. हातात स्वकष्टाचा पैसा खेळू लागला. कुटुंबाला आर्थिक हातभार लागल्याने घरातील महिलेचे स्थानही उंचावले. घरात मानाचा दर्जा मिळाला. आता या महिला इतरही व्यवसायाच्या संधी शोधू लागल्या आहेत. या महिलांनी विविध व्यवसायातून नफा मिळवून त्यात चांगला जम बसवला आहे. पण, त्याचबरोबर या महिला विविध सामाजिक उपक्रमातही सहभागी होत असतात. गुहागर बीचवर या महिला बचत गटाने नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविली. त्याचबरोबर वृक्षारोपण, जनजागृती यांसारख्या उपक्रमांमध्येही या महिलांनी सक्रिय सहभाग दर्शविलेला आहे. या बचत गटाच्या अध्यक्षा रश्मी पालशेतकर यांनी २०१०मध्ये स्वामी समर्थ स्वयंसेवा संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. पालशेतकर यांनी आतापर्यंत ३५० बचत गट स्थापन केले आहेत. त्यापैकी ४० बचत गटांचे फेडरेशन स्थापन केले आहे. त्यामुळे तर आता या महिलांच्या व्यवसायाच्या कक्षा रूंदावलेल्या आहेत. आता तर या फेडरेशनचे कोकण रत्न ब्रँडही तयार झाला आहे. या ब्रँडखाली आता या महिलांनी बनवलेल्या आंबोळी पीठ, विविध मसाले, मोदक पीठ, थालीपीठ भाजणी यांचे दर्जेदार उत्पादन बाजारात जाऊ लागले आहे. उत्कृष्ट दर्जा, आकर्षक पॅकिंग यामुळे वस्तुंना मागणी वाढली आहे, हे सांगायलाच नको. या महिलांच्या वस्तुंचे पॅकिंग, मार्केटिंग याची जबाबदारी स्वामी समर्थ स्वयंसेवा संस्था घेत असल्याने महिलांची ही समस्याही संपुष्टात आली आहे. हे ४० बचत गटांचे फेडरेशन आता तर काजू युनिटही चालवीत आहे. या फेडरेशनची तीन महिन्यातून एक सभा होते. मात्र, या सभेला सर्वच महिला अगदी झाडून उपस्थित राहतात. सर्व उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. बचत गटांतर्गत आर्थिक व्यवहार सुरू आहेत, पण फेडरेशन म्हणजेही एक छोटीशी बँकच आहे. फेडरेशनमधून महिलांची आर्थिक गरज भागवली जाते. मात्र, या सर्वच महिला घेतलेले कर्ज आणि त्याचे व्याज विनाविलंब अगदी वेळेतच फेडतात. या सर्व महिलांचा भर आपले उत्पादन गुणवत्तापूर्ण कसे असेल, यावर आहे. आज या महिला कष्टाने आणि जिद्दीने आपल्या व्यवसायातून विकासाची भरारी घेत आहेत. त्यांचे समाजातीलही स्थान आता सन्मानाचे झाले आहे. आज या महिला उद्योजक म्हणून सन्मानाने वावरत आहेत. त्यांची बचत गटाची चळवळ दिवसेंदिवस बळकट होत आहे. घरगुती पदार्थांपासून सुरू झालेल्या व्यवसायाला वाढवण्याचे काम या बचत गटाने केले आहे. त्याचबरोबर येथील व्यवसायाचा कणा असलेल्या शेतीलाही त्या विसरल्या नाहीत. त्या माध्यमातून वेगवेगळी लागवड करण्यावर त्यांचा भर आहे. विशेष म्हणजे या महिलांमध्ये एकी असल्यानेच बचत गटाचे कार्य उत्तरोत्र वाढत आहे. घरसंसार सांभाळताना कसरत करावी लागतेच पण ती करतानाच यशस्वी उद्योजिका म्हणूनचही आपले स्थान बळकट करीत आहेत, हे तेवढेच महत्त्वाचे आहे. - शोभना कांबळेशेतीबरोबर हळद लागवडीचाही प्रयोग ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढला की त्याही इतर व्यवसायात भरारी घेतानाच भाजीपाला लागवड , शेती लागवड, हळद लागवडीतही विविध प्रयोग करू शकतात, याचा प्रत्यय गुहागर येथील श्रेयस स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी आणून दिला आहे. या बचत गटाच्या अध्यक्षा रश्मी पालशेतकर यांनी या भागातील ४० बचत गटांच्या फेडरेशनमधून या सर्व महिलांना विविध व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आज या सर्वच महिला आत्मनिर्भर आणि स्वयंपुर्ण झाल्या आहेत.बचत गटाने आत्मनिर्भर व्हावे, हा आमचा मुख्य हेतु आहे. त्यासाठी महिला उद्योजक व्हाव्यात, त्यांच्यात गुणवत्ता निर्माण व्हावी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असतो. महिला बचत गटांचे फेडरेशन स्थापन केल्याने आता महिलांना खूप संधी मिळू लागली आहे. - रश्मी पालशेतकर, अध्यक्ष