शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

Satara Bus Accident : अस्वस्थता... हळहळ आणि नियतीचा काळा पडदा दापोलीवर पांघरलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:31 IST

शनिवार, २८ जुलै २०१८ नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. बायको विद्यापीठात परीक्षा विभागात कार्यरत असल्याने तिला चौथ्या शनिवारची सुट्टी होती. माझी कार सर्व्हिसिंग करायची असल्याने सुशांत जाधव नावाच्या शिपायाला सोबत घेऊन गेलो. येत असताना त्याने हेमंत पुळेकरच्या बाईक रिपेरिंगच्या दुकानासमोर गाडी थांबवली आणि विचारले ह्यउद्याचे रघुवीर घाटात जायचे फिक्स ना? समोरुन होकार आला.

ठळक मुद्देअस्वस्थता... हळहळ आणि नियतीचा काळा पडदा दापोलीवर पांघरलेलाकाळोखाला काळी किनार गडद

प्रा. कैलास गांधीदापोली : शनिवार, २८ जुलै २०१८ नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. बायको विद्यापीठात परीक्षा विभागात कार्यरत असल्याने तिला चौथ्या शनिवारची सुट्टी होती. माझी कार सर्व्हिसिंग करायची असल्याने सुशांत जाधव नावाच्या शिपायाला सोबत घेऊन गेलो. येत असताना त्याने हेमंत पुळेकरच्या बाईक रिपेरिंगच्या दुकानासमोर गाडी थांबवली आणि विचारले उद्याचे रघुवीर घाटात जायचे फिक्स ना? समोरुन होकार आला.कॉलेजात जाताच क्षणी विद्यापीठातील ग्रुपचे देवाचा डोंगर येथे जाण्याचे ठरल्याचे आठवले म्हणून बायकोला फोन करून खातरजमा केली. ती म्हणाली पुढच्या महिन्यात जायचे आहे. विकी (म्हणजे विक्रम शिंदे) सांगणार आहे. आज ते महाबळेश्वरला गेले आहेत. साधारणत: अर्धा तास वगैरे कालावधी गेला असेल बायकोचा फोन परत आला. तिने थरथरत्या आवाजात सांगितले की, विद्यापीठाच्या ट्रीप गेलेल्या गाडीला अपघात झालाय, असे कळते आहे.

प्रकाश सावंतदेसाई वर आलेत, त्यांनी ही माहिती दिलीय. नेहमीप्रमाणे खात्री करण्याची सवय असल्याने मी तिला प्रकाशच्या बायकोला म्हणजे सुषमाला फोन करुन विचारणा करण्याचे सांगितले. मीसुद्धा फोन करायला सुरुवात केली.

प्रकाश इतरांना फोन लावण्यात कार्यरत असेल, त्यामुळे संदीप सुवरेला फोन करायला सुरुवात केली. मात्र, त्याचा फोन एंगेज लागत होता. माझ्या बाजूने जात असलेल्या माझी सहकारी प्राध्यापक प्रियांका साळवी - कदम हिने विचारणा केली. सर! काय झालं? मी ओघात बोलून गेलो विद्यापीठाच्या बसला अपघात झालाय! तिने लगेच विचारलं, सर कोणत्या बसला? मी म्हणालो, आज एक ट्रीप गेली होती, महाबळेश्वरला त्या बसला. ती यावर घाबरली म्हणाली, अरे देवा! त्याच्यात पंकज म्हणजे तिचा नवरादेखील आहे.

मी तिला समजावलं फार काही गंभीर नसावं, पण तिथे आपल्याकडील कुणीच नसल्याने निश्चित काही कळत नाही. मी फोनाफोनी करत होतो. कुलगुरुंचे स्वीय सहाय्यक दुसाने सर यांना फोन लागला, ते म्हणाले, आम्ही खेडपर्यंत पोहोचलो आहोत. जागेवर गेल्याशिवाय परिस्थितीचा अंदाज येणार नाही. तेवढ्यात पुन्हा बायकोचा फोन आला.

कुणीतरी चौघेजण वर आलेत असे म्हणतात. आशावाद बळावला, मी फोन ठेवतोय तोच प्रा. प्रिया करमरकर सांगत आली की, प्रियांका रडते आहे. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, पंकजचा फोन लागत नाही. मी तिला तिकडे रेंजचा प्रॉब्लेम असणार असे सांगितले.

मी तिला घरी सोडतो, तू घरी जा, म्हणजे आपल्या माणसात तुझा ताण कमी होईल आणि तळमजल्यावर आलो तेव्हा लक्षात आले की, आपण आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकलीय. लगेच प्रा. श्याम साठे यांच्या गाडीच्या किल्ल्या मागायला गेलो, तेव्हा तोही याबाबत अनभिज्ञ होता. त्याच्याकडील किल्ल्या घेऊन सोबत राजेंद्र मोरे याला तसेच दोन महिला सहकाऱ्यांना घेऊन प्रियांकाला घरी सोडायला निघालो. वाटेतच पुन्हा बायकोचा फोन आला, अरे असं म्हणताहेत सगळे सुखरुप आहेत. मी प्रियांकाला गाडीतून उतरवताना ही खबर दिली व मला जशी माहिती मिळेल, तसे कळवतो, असे आश्वासन दिले.तेवढ्यात शिपाई शिवगण धावतच सांगत आले, गांधी सर सात जणांचे मृतदेह बाहेर काढलेत, असे बातम्यात दाखवताहेत. माझ्या पायाखालची वाळू सरकली. खोटा आशावाद संपत चालला होता. कारण ज्या दरीचा फोटो बातम्यात दाखवत होते, ते पाहाता त्या दरीची खोली लक्षात येत होती आणि सर्व आशावादी शक्यतांवर महाबळेश्वरहून अधिक घट्ट धुके पसरत चालले होते आणि ते विरळ होण्याऐवजी क्षणाक्षणाला गडद आणि काळे होत चालले होते.

संध्याकाळी काळोखाला काळी किनार गडद होत असताना विकी शिंदे, राजू रिसबुड याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आल्याचा विद्यापीठातील मित्र सचिन कदम याचा फोन आला. त्यामुळे प्रज्ञा (बायको)ला घेऊन तिकडे गेलो. अख्खी दापोली तेथे लोटली होती. गाडी पार्क करुन रुग्णालयात गेलो तेव्हा एक एक अ‍ॅम्ब्युलन्स १५-२० मिनिटांनी येत होती. सायरनचा आवाज असह्य होऊ लागला होता. खूप काही गमावल्याची जाणीव काळजाला चरे पाडत होती.गाडी खाली गेलेय...विकी शिंदेला फोन केला तरी परिस्थिती बदलली नाही. प्रकाश सावंतदेसाई, जयंत चोगले, राजू बंडबे, संतोष जालगावकर, हेमंत शिंदे सगळ्यांचे फोन बिझी येत होते. स्वाभाविक ही सर्व मंडळी कदाचित आपण सुखरुप आहोत, हे आप्तस्वकियांना कळवत असतील, असा आशावाद बळावला. तेवढ्यात बायकोचा फोन आला, सुषमाशी बोलणं झालंय प्रकाश बरा आहे, पण तो म्हणतोय गाडी खाली दरीत गेलीय आणि त्यात सगळेजण आहेत.क्षणभर कुणालाच काही कळलं नाहीकुलगुरुंचे स्वीय सहाय्यक दुसाने सर यांना फोन लागला, ते म्हणाले, आम्ही खेडपर्यंत पोहोचलो आहोत. जागेवर गेल्याशिवाय परिस्थितीचा अंदाज येणार नाही. प्रियांका बाजूला फारच अस्वस्थ झाली होती. ती ओक्साबोक्सी रडत मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटकडे धावत गेली. याविषयी गंभीरता पसरली नसल्याने कुणाच्या ते लक्षात आलं नाही.  मी महिला सहकाऱ्यांना प्रियांका कुठे आहे, पहा, असे सांगितल्यावर त्यांना कळलं नाही, सर असे का सांगत आहेत.साऱ्यांनीच बातम्या पाहायला सुरुवात केलीतिला सोडून परत येताना पुन्हा प्रज्ञाचा फोन आला, अरे एकटे प्रकाश सावंतदेसाई वाचलेत, बाकीचे सर्व गेलेत, असं म्हणताहेत. मी तिला म्हणालो, मलाही असं कळलंय. पण ही अफवादेखील असू शकते, तू शांत राहा. मात्र, कॉलेजला पोचलो तेव्हा कार्यालय व प्राचार्यांनी बातम्या पाहायला सुरुवात केली होती. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी