शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रत्नागिरी मनोरूग्णालय अधीक्षकपद रिक्त

By admin | Updated: August 31, 2014 23:30 IST

दीड वर्ष वालीच नाही : वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची फरपट

रत्नागिरी : शहरातील मनोरूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची बदली झाली असल्याने गेले दीड वर्ष हे पद रिक्त आहे. भूलतज्ज्ञांकडे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय मनोरूग्णालयात वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे रूग्णांना जिल्हा शासकीय रूग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे सध्या कर्मचारी व रूग्णांची अक्षरश: फरपट होत आहे.मानसिक स्थिती असंतुलित असणाऱ्या रूग्णांसाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालय १८८६ मध्ये स्थापन झाले. ब्रिटिशकालीन मनोरूग्णालयात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार केले जातात. सुरूवातीला विद्युतशॉक पध्दती अवलंबण्यात येत होती. मात्र, कालांतराने त्यामध्ये बदल झाला असून, अ‍ॅडव्हॉन्स उपचार पध्दती अवलंबविण्यात येत आहे.ऐश्चिक व पोलिसांमार्फत या ठिकाणी रूग्ण दाखल केले जातात. मात्र, १८ वर्षांपुढे असणाऱ्या रूग्णांवर याठिकाणी उपचार केले जात आहेत. १८ वर्षांखालील रूग्णांवर उपचार करताना त्याच्या नातेवाईकांना सोबत ठेवले जाते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १८ वर्षांपुढील रुग्णांना उपचार देताना त्यांच्याशी समुपदेशन साधून त्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न अधिक केला जातो. जेणेकरून त्यांच्याबद्दल माहिती मिळविली जाते. परराज्यातील रूग्णाचा पत्ता शोधण्यासाठी कार्यालयीन कामानंतर इंटरनेटवर सर्च केले जाते. आदिवासी समाजातील रूग्ण असतात, तेव्हा मात्र अडचण निर्माण होते.काही रूग्ण असे असतात की, त्यांना खाण्याचेही भान नसते. त्यांना शिकवावे लागते. काहीजण बरे झाल्यानंतर घरी जातात. मात्र, काहींना नातेवाईक स्विकारतच नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना, पोलीसपाटील, सरपंच यांच्यामार्फत समज देऊन ताब्यात देण्यात येते. काही गुन्हेगारीक्षेत्रातून मनोरूग्ण दाखल केले जातात. त्यांना नातेवाईक ताब्यात घेण्यास धजावत नाहीत, तेव्हा समज देऊन ताब्यात देण्यात येतात. काही रूग्ण बरे होतात. मात्र, त्यांचे नातेवाईक सापडत नाहीत. अशावेळी या व्यक्तिंना मनोरूग्णालयातच ठेवून घेतले जाते. असे असताना अधीक्षकपद रिक्त असणे किंवा वैद्यकीय अधिकारी नसणे, याबाबत रूग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालिन अधीक्षक डॉ. राजेंद्र शिरसाट यांची बदली मार्च २0१३ मध्ये झाल्यानंतर भूलतज्ज्ञ माने यांच्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. परजिल्ह्यातून खासगी वाहनाने रूग्ण उपचारासाठी आणला जातो. भूलतज्ज्ञाकडून तात्पुरते उपचार केले जात असले तरी ते प्रभावी नाहीत. त्यामुळे दीड वर्ष पद रिक्त असणे आश्चर्यकारक गोष्ट आहे. याबाबत डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसापूर्वी जिल्हा शासकीय रूग्णालयातील डॉ. पराग पाथरे यांच्याकडे प्रभारी अधीक्षकपदाची धुरा देण्यात आली आहे.मनोरूग्णालयासाठी पाच आरोग्य अधिकारी पद मंजूर असताना याठिकाणी एकही आरोग्य अधिकारी उपलब्ध नाही. शासनाकडून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरूग्ण आजारी पडला तर त्यास जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. एकूणच कर्मचाऱ्यांनाच त्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. डॉ. पाथरे एकटे बाह्यरूग्ण व अंतर्गत रूग्णांवर उपचार कसे करू शकतील? एकूण पाच वैद्यकीय अधिकारी व एक अधीक्षक मिळून सहा डॉक्टरांची जबाबादारी सांभाळणे अवघड आहे. त्यामुळे नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)भूलतज्ज्ञांकडे अधीक्षकांची जबाबदारी पुरूष रूग्ण १३६ ते १४०स्त्री रूग्ण ६६ ते ७०, ७५ ते ८५ वयोगटातील रूग्ण ४० ते ४५वृध्द थकलेले रूग्ण ६ ते ८परजिल्ह्यातील ६० टक्के रूग्णपरराज्यातील २० रूग्ण, बाह्यरूग्ण कक्षात दररोज ८० ते ११० रूग्ण उपचार घेतात. असे असतानाही या महत्वाच्या मनोरुग्णालयात अधीक्षक नसावेत हे दुर्दैवी आहे. भूलतज्ज्ञांकडे अधीक्षकांची जबाबदारी पुरूष रूग्ण १३६ ते १४०स्त्री रूग्ण ६६ ते ७०, ७५ ते ८५ वयोगटातील रूग्ण ४० ते ४५वृध्द थकलेले रूग्ण ६ ते ८परजिल्ह्यातील ६० टक्के रूग्णपरराज्यातील २० रूग्ण, बाह्यरूग्ण कक्षात दररोज ८० ते ११० रूग्ण उपचार घेतात. असे असतानाही या महत्वाच्या मनोरुग्णालयात अधीक्षक नसावेत हे दुर्दैवी आहे.