खेड : गणेशोत्सव काळात कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा ते रत्नागिरी, दिवा ते सावंतवाडी गाड्या सुरू केल्या होत्या. या गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार होत्या. या गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली असून, आता या ३१ ऑक्टोबरपर्यंत चालविण्यात येणार असल्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांचा लाभ होणार आहे. गाडी क्रमांक ०१५०३/०१५०४ दिवा-रत्नागिरी दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस ३० सप्टेंबरऐवजी ३१ ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक दिवा-सावंतवाडी रोज दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस विशेष गाडी १ ऑक्टोबर ऐवजी ३१ ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ०१५०६ सावंतवाडी रोड ते दिवा दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस ३० सप्टेंबरऐवजी ३१ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक ०१५०१ रत्नागिरी ते मडगाव दैनंदिन आरक्षित एक्स्प्रेस १ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबरपर्यंत धावेल. गाडी क्रमांक ०१५०७ सावंतवाडी रोड ते मडगाव दैनंदिन आरक्षित विशेष गाडी १ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबरपर्यंत धावेल.