खेड : औद्योगिकीकरण व आधुनिक युगामध्ये भारतीय संस्कृतीमधील १२ बलुतेदारांपैकी असलेल्या बुरूड व्यवसायाला विविध कारणांनी़़़ आता उतरती कळा लागली आहे. पोट भरण्यासाठी या समाजावर आता लाकडाची मोळी विकण्याची वेळ आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या अवजांरामुळे हा उद्योग अडचणीत आला आहे़ याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा व या व्यवसायाच्या तेजीसाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे़ विशेष म्हणजे याकरिता राज्य सरकारने नवे धोरण जाहीर करण्याची मागणी या समाजाकडून होत आहे़शेती लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहणार की काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे़ भातधान्य साठविण्यासाठी लागणारी टोपली , सुपं, चाळणी, वेतापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु शेतकरी मोठया प्रमाणात वापरतात़ या सर्व वस्तु बांबूंच्या साहाय्याने तयार करण्यात येत असल्याने बांबूच्या वाढलेल्या दराचा परिणाम या वस्तुंच्या दरावर होत आहे़ बांबूच्या या वस्तुंच्या दराच्या तुलनेत सध्या प्ल्ॉस्टीकच्या वस्तु किंमतीत स्वस्त असल्याने या व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला आहे़ विशेष म्हणजे प्लॅस्टीकच्या वस्तु वापरणे सोयीचे आणि कमी खर्चाचे असल्याने त्यांना बाजारात मागणी आहे़ याउलट बांबूंचे वाढते दर आणि अव्वाच्या सव्वा मजुरीचे दर यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे़ शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याने वेतांच्या वस्तुची मागणी घटली़ तर दुसरीकडे प्लास्टीकचे आक्रमण झाल्याने या वस्तु इतिहास जमा होऊ लागल्या आहेत़बांबु व वेताची किंमती वाढल्या़ वस्तुंच्या किमतीपेक्षा जास्त मेहनत पडत असल्याने सध्या भूक भागविणे कठिण झाले असल्याने बुरूड व्यवसाय धोक्यात आला आहे. काहींनी आपला पारंपारीक व्यवसायही बंद केला आहे़ त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे़. अनेकांना मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे़ तर काहींनी वडीलोपार्जित धंदा म्हणून सुरू ठेवला आहे़ अशातच बांबूंची कमतरता आणि चढत्या किंमती या साऱ्यात बुरूड व्यवसाय आज लोप पावला आहे़ याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा बुरूड समाजाची आहे़ या समाजाला न्याय मिळाल्यास या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल़खादी ग्राम उद्योगाने या व्यवसायाला संरक्षण देणे आवश्यक आहे़ खादीच्या अनेक योजना या व्यवसायाला पूरक आहेत़ विशेष सवलतीही दिल्या जात आहेत़ मात्र घेतलेल्या कर्जाचा विनीयोग केला जात नसल्याची ओरड आहे़ खादी ग्रामोद्योगकडून कर्ज घेतांना अनेकांना मध्यस्थांची मदत घ्यावी लागत आहे़ अज्ञानामुळे हे अनेकवेळा घडते़ त्याकरिता त्यांना मध्यस्थांना काही पैेसे किंवा टक्केवारीही मोजावी लागल्याचे अनकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे कर्जाची परतफेड करताना या व्यावसायीकांना मोठया अडचणी येतात़ मात्र या व्यावसायाला उत्तेजनासंदर्भात राज्य सरकारने ठोस कृती केल्यास थेट या व्यावसायिकालाच कमी दराने कर्जपुरवठा होऊ शकेल़ आणि यातूनच या आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या वस्तुंच्या बाजारपेठेत बुरूड व्यवसाय टिकू न राहू शकेल. (प्रतिनिधी)
बुरूड व्यवसायासाठी नव्या धोरणाची मागणी
By admin | Updated: August 6, 2015 23:43 IST