शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

संगणक शिक्षण संकटात

By admin | Updated: August 27, 2015 23:37 IST

खेड तालुका : विजेचे बिलच भरले नसल्याने शाळा अंधारात

श्रीकांत चाळके- खेड   हायटेक शिक्षणाची कास धरून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. दोन वर्षांपूर्वी ही योजना अमलात आली आहे. प्राथमिक पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तंत्रशिक्षणाची भर पडावी, हा यामागचा हेतू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील १३३ प्राथमिक शाळांनी विजेची बिले न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, खेड तालुक्यातील तब्बल ६० शाळांना याचा फटका बसला आहे.खेड तालुक्यात ३७९ प्राथमिक शाळा आहेत़ त्यातील ६० प्राथमिक शाळांमधील विजेची जोडणी तोडण्यात आली आहेत़ शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम हाती घेतली होती. त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकले. त्यापाठोपाठ आजच्या गतिमान शिक्षण प्रणालीच्या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ओढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला.दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणक उपलब्ध करून दिले गेले. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा झाला़ त्यांना पायाभूत प्रशिक्षणही मिळू लागले. एकीकडे ही ज्ञानाची गंगा ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात असतानाच १३३ शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याने तेथील शेकडो विद्यार्थ्यांच्या हायटेक शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.वीजबिल भरले नसल्याने अशा शाळांचा महाविरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या शाळांमधील संगणकही पडून आहेत.यापूर्वी शासनाकडून मिळणाऱ्या ४ टक्के सादील योजनेच्या निधीतून शाळांसाठी आवश्यक असलेली वीजबिले, खडू, पाणीबिल भागविले जाते. मात्र, दोन वर्षांपासून या योजनेअंतर्गत शिक्षण विभागाला निधीच मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीची विविध बिलेही थकली आहेत. ४ टक्के सादील योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून ही बिले यापूर्वी भरली जायची. परंतु हा निधीच न मिळत नसल्याने बिले भरलेली नाहीत तर वीजबिलांना वाणिज्य दर लावण्यात आल्याने ती भरणेही ग्रामस्थांना अशक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे.जिल्ह्यात २७४६ शाळा आहेत. गतवर्षी आॅक्टोबरअखेर यापैकी १३३ प्राथमिक शाळांमध्ये विजेचे जोडणी तोडण्यात आली होती, तर खेड तालुक्यातील ३७९ प्राथमिक शाळांमधील तब्बल ५० पेक्षा जास्त प्राथमिक शाळांमधील विजेची जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांबरोबरच संगणक संचही अंधारात पडून असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.शिक्षण विभागाचे दुर्लक्षखेड तालुक्यातील विजेची जोडणी तोडलेल्या प्राथमिक शाळांची संख्या लक्षणीय असून, तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. काही शाळांची बिले स्थानिक पातळीवर ग्रामस्थ किंवा पालकांनी तसेच लोकनिधी गोळा करून भरली आहेत. मात्र, अशा शाळांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढीच आहे. उर्वरित प्राथमिक शाळांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दोन वर्षे ही समस्या कायम असताना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.युती सरकार लक्ष पुरवेल ?महावितरण कंपनीने प्राथमिक शाळांमधील विजेची बिले वाणिज्य दराने आकारल्याने बिले भरणे अशक्य झाले आहे़ ही बिले भरणे ग्रामस्थांनाही अशक्य आहे. प्राथमिक शाळांमध्ये ही बिले भरण्याबाबत कोणत्याही निधींची तरतूद करण्यात आली नाही. लोकसहभागातूनच ही बिले भागवली जातात. महावितरणने ही बिले घरगुती दराने आकारावीत, यासाठी विधिमंडळात महावितरणशी बोलणी सुरू असल्याची माहिती गतवर्षी शिक्षण विभागातर्फे देण्यात आली होती. मात्र, आघाडी सरकारच्या घुमजावामुळे याप्रकरणी दुर्लक्ष झाले. आता युती सरकारने याबाबत स्वत: लक्ष घालणे आवश्यक आहे़