चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने शासनाच्या २० टक्के शेती कर्ज देण्याच्या धोरणाचे स्वागत केले आहे. संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत दुग्ध व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तीला दोन संकरित गायी वा म्हशींसाठी १ लाख रुपये कर्ज दोन योग्य जामीन घेऊन देण्यात येणार आहे. ५ संकरित गायी व म्हशींसाठी ३ लाख कर्ज तसेच १० संकरित गायी व म्हशींसाठी ५ लाख रुपये कर्ज योग्य तारण घेऊन विनाविलंब देण्यात येणार आहे.निसर्गातील होणाऱ्या बदलामुळे शेतकरी चिंतातूर आहे. अशा स्थितीत शेतकरी शेतीत टिकून राहायचा असेल तर शेतीसाठी पूरक असलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांना जोडधंदे देणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सर्व एजन्सीजनी समन्वय साधून कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक शक्ती देणारे व्यवसाय देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेने शासनाच्या धोरणानुसार एकूण ४५ कोटी निधीची तरतूद शेतकऱ्यांच्या शेती विषयक विकासासाठी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना प्राधान्य दिले आहे. यासंबंधी चिपळूण नागरी पतसंस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात संस्थेच्या सर्व समन्वयकांचा सहभाग महत्त्वाचा असेल. त्यांनी योग्य व्यक्तींची माहिती संस्थेच्या नजीकच्या शाखेत देऊन गरजूंना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे.यासाठी संस्थेमार्फत २४ जुलै रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली. चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना प्राधान्य दिले असल्याने आता चिपळूण नाग९रपीने या साऱ्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून असे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यात यासंबधी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्याला यापुढे स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांमधून फायदा मिळण्यासाठी संस्था प्रयत्नशील. निसर्गातील बदलाचा परिणाम शेतकऱ्याच्या जीवनमानावर होत असल्याने त्याला उपकारक. पर्यायी उत्पन्नासाठी शेतकऱ्याने पशुपालनाकडे वळण्याचा संदेश.समन्वयकांतर्फे घेतले जाताहेत परिश्रम. संस्थेमार्फत २४ जुलै रोजी सभा होणार. शेतीसाठी पूरक योजना महत्त्वाच्या.
दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST