शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘जलयुक्त’मुळे ओलमणमध्ये पाणी...

By admin | Updated: October 24, 2016 02:50 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या ओलमण या गावात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे.

कर्जत : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या ओलमण या गावात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. सिमेंट बंधारे आणि मातीच्या बांधामुळे आता त्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भाजीपाला करता येणार आहे. कृषी, वन आणि लघु सिंचन विभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे तब्बल ९०.३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे, त्यामुळे भूजल पातळीत देखील वाढ झाली आहे.रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक समजले जाणारे ओलमण या गावात राहणाऱ्या आदिवासी लोकांना उन्हाळ्यातील चार महिने प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जेमतेम १०० घरांची वस्ती असलेल्या कर्जत तालुक्यातील या गावाची ओळख म्हणजे पहिले आमदार मनोहर पादिर यांचे गाव आहे. शासनाने नळपाणी योजना राबविली आहे, मात्र योजना मोडकळीस आल्याने जानेवारी महिन्यापासून येथील आदिवासींची पाण्यासाठी धावपळ सुरू होते. त्यामुळेच ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू होताच ओलमण गावाचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. पहिल्या वर्षी वन विभागाने जलशोधक खंदक खोदून जमिनीमध्ये पाणी जिरविण्याचे काम केले. काही याठिकाणी मातीचे बांध बांधले गेले, परंतु केवळ एक सिमेंट नाला बांध ओलमण-नांदगाव रस्त्यावर पहिल्या वर्षी झाला होता.२०१५-१६ मध्ये ओलमण परिसरातील डोंगराळ भागात जमिनीमध्ये पाणी जिरविण्याचे काम करण्यासाठी ११ ठिकाणी मातीचे बांध बांधण्यात आले. पेंढरी, तेलंगवाडी या ठिकाणी मातीचे बांध बांधताना तब्बल २५ लाख रु पये खर्चून लघु पाटबंधारे विभागातील लघु सिंचन विभागाने पेंढरी येथील नाल्यावर मोठा सिमेंट बंधारा बांधला. १० दलघमी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या त्या सिमेंट बंधाऱ्यामुळे पेंढरी भागाला पाणीटंचाई भासणार नाही असे चित्र त्या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे निर्माण झाले आहे. दुसरीकडे कृषी विभागामार्फत ४ सिमेंट नालाबांध बांधले जाणार होते. सर्व कामे ई-निविदा पद्धतीने झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी दोन सिमेंट नालाबांध तयार झाले. मात्र तयार झालेले दोन्ही सिमेंट बंधारे हे मागील वर्षी बांधलेल्या बंधाऱ्याच्या वरच्या भागात दोन वेगवेगळ्या नाल्यांवर बांधले आहेत. त्यामुळे आता त्या तीन सिमेंट नालाबांधांची साखळी तयार झाली आहे. त्याचा फायदा त्या खाली असलेल्या ओलमण, तेलंगवाडी आणि पेंढरी येथील ३० हेक्टर जमिनीला होऊ शकतो.कृषी विभागाने निवडलेल्या जागांवर बांधलेल्या बंधाऱ्यांचा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. (वार्ताहर)