शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:40 IST

शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे.

अजय कदम माथेरान : शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे हा उदात्त हेतू माथेरानच्या बाहेरील परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिसत नाही. डोंगरदºया चढून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.माथेरान डोंगराच्या पायथ्याशी हशाच्या पट्टी आणि गारबट या गावांमध्ये ४ थीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जवळचे शहर म्हणून माथेरानच आहे. त्यामुळे येथील विद्य ार्थी हे पुढील शिक्षणासाठी माथेरानचा डोंगर चढत आहेत. एकूण त्यांना तीन किलोमीटरचा दºयाखोºयांचा डोंगर आणि तिथून तीन किमी माथेरानचा लाल मातीचा रस्ता म्हणजे येऊन जाऊन १२ किलोमीटर हे विद्यार्थी पायपीट करीत आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या मानसिकतेवर व शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचा सामना करत हे विद्यार्थी जोरदार पाण्याच्या प्रवाहामधून वाट काढत हे शिक्षण घेत आहेत. उंच कडा, नागमोडी वळणे, खोल दरीतील पाऊल ठेवण्याएवढी पाऊल वाट पार करत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने गृहपाठ करण्यासाठी वेळ मिळत नाही.त्यांच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे.प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर या शाळेने दिलेल्या माहितीनुसार माथेरानच्या अतिवृष्टीमुळे या पावसाळ्याच्या दिवसात या विद्यार्थ्यांची हजेरी रोडावते त्यामुळे हे विद्यार्थी हुशार असून ही नापास होतात. हे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी माथेरानमध्ये राहावे जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही.आमच्या गावात ४ थीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी आम्हाला माथेरान जवळ असल्याने आम्ही येथे शिक्षण घेतो. हे शिक्षण घेत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उंच डोंगर चढून माथेरानमध्ये यावे लागते त्यामुळे आमची दमछाक होते. आमची शारीरिक आणि मानसिक स्थिती या खडतर प्रवासामुळे बिघडून जाते. आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, सरकारने जर आम्हा आदिवासी लोकांसाठी माथेरानमध्ये वसतिगृह बांधले तर आमचे पुढील शिक्षण सुखकर होईल.- आकाश नरेश खडके,विद्यार्थी, इयत्ता १० वी