शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

होळीचा जल्लोष सुरु असताना ‘त्या’ सहा जणांनी वाचवले गाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 19:26 IST

फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच वाजता गावाजवळच्या भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास समुद्र उधाणामुळे पडत असलेली भगदाडे बुजवण्यासाठी किर्र अंधारात बॅटरीच्या प्रकाशात धडपडत होते.

- जयंत धुळप

अलिबाग : फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच वाजता गावाजवळच्या भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास समुद्र उधाणामुळे पडत असलेली भगदाडे बुजवण्यासाठी किर्र अंधारात बॅटरीच्या प्रकाशात धडपडत होते. त्यांचे लक्ष एकच होते, शांतपणे झोपलेल्या गावात समुद्राच्या लाटांचे पाणी घुसू द्यायचे नाही आणि गाव वाचवायचे. रात्री अडीच ते पहाटे साडेपाच अशा तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांना शेवटी यश आले. उगवत्या सूर्याच्या किरणांबरोबर गावात या सहा जणांच्या धाडसाचे वृत्त पसरले आणि काहींनी त्यांना डोक्यावर घेतले तर काहींच्या डोळ्यात अश्रू तराळले.

...ग्रामस्थ झोपी गेले होतेशुक्रवारी रात्री होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीच्या होमात जुन्या अविचारांना भस्मसात करुन शाहापूरकर ग्रामस्थ आपापल्या घरी झोपी गेले होते. तसे हे बहाद्दर सहा जण देखील रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरी पोहोचले होते. गेल्या सहा ते आठ अमावास्या आणि पौर्णिमेला गावाच्या किना-यावरील समुद्र संरक्षक बंधा-यांना उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे पडून समुद्र भरतीचे पाणी गावाच्या वस्तीपर्यंत पोहोचले होते. त्यावर मात करण्याकरीता हे सर्व समुद्र संरक्षक बंधारे श्रमदानातून दुरुस्त करण्याचा निर्णय गावकीने घेतला. सलग पाच दिवस गावांतील किमान 600 ग्रामस्थ स्त्री-पुरुष शेतक-यांनी दररोज अथक श्रमदान करुन हे बंधारे बांधून काढून आपले गाव सुरक्षित केले होते. 

.. .यांना लागली कुणकुण बंधारा फुटीचीहोळी पौर्णिमेच्या दिवशी विशेषत: रात्री येणारे समुद्राचे उधाण मोठे असते, असा शहापूर मधील वयोवृद्ध जाणकार शेतक-यांचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरनाथ भगत गुरुवारी रात्री अत्यंत जागृक होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा मागील शेताच्या खाचरात(नाल्यात) पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याची शंका त्यांना आली. त्यांनी त्याची खातरजमा केली तर भंगारकोठा संरक्षक बंधा-यास मोठ्या उघाडी जवळ समुद्र भरतीच्या उधाणाच्या लाटांनी भगदाड(खांड) पडत असल्याचे लक्षात आले. भगदाड शेजारील उपलब्ध चिखलमातीतून बुजवण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर अमरनाथ भगत यांनी आपले शेजारी रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील यांना हाक दिली. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला.  बॅटरी, फावडे, घमेले घेवून हे सहा शेतकरी गावाच्या स्मशानाशेजारच्या पायवाटेने भंगारकोठा संरक्षक बंधा-या जवळच्या मोठय़ा उघाडीवर पोहोचले आणि त्यांनी भगदाड बुजवण्यास प्रारंभ केला. समुद्रालाच थोपवण्याचे हे काम होते, परंतू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा अथक सामना करुन तीन तासांच्या कष्टाअंती त्यांना हे भगदाड बुजवण्यात यश आले. पाच वाजण्याच्या सुमारास भरतीच्या उधाणाचा जोर देखील कमी झाला आणि या बहाद्दर सहा शेतक-यांना आपले गाव वाचविण्यात यश आले आहे.

शासनाच्या आपत्ती निवारण यंत्रणोची गंभीर शोकांतिकाकेंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन ते गांव अशी आपत्ती निवारण यंत्रणा अस्तीत्वात आहे. पंरतू गेल्या दोन तिन वर्षापासून अमावास्या-पौर्णिमेला येणा:या समुद्राच्या मोठय़ा उधाणाच्या भरती आणि त्यामुळे संमुद्र संरक्षक बंधारे फूटून गावांत समुद्राचे पाणी घुसण्याच्या संभाव्य धोक्यांची पूर्व कल्पना देणारी कोणतीही आपत्ती निवार यंत्रणा अद्याप अस्तीत्वातच आली नसल्याने खारेपाटातील या शेतकरी बांधवांना आपल्या गावांच्या सुरक्षेसाठी स्वत: सक्रीय कार्यरत व्हावे लागते आहे. गुरुवारी मध्यरात्री भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास भगदाड पडून  आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती शुक्रवारी धुळवडीची सुट्टी असल्याने रायगड जिल्हा प्रशासनास शनिवार दि.3 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता, तब्बल 30 ते 33 तासांनी पोहोचणार आहे. आपत्ती निवारण यंत्रणोची ही गंभीर शोकांतीका असल्याची भावना अमरनाथ भगत यांनी व्यक्त केली आहे. 

रोजगार हमी योजनेत कशी बसवणार बंधारे फूटीची आपत्तीजिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी समुद्र संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचे जाहीर केले आहे. त्याचे आम्ही देखील स्वागत केले आहे. गुरुवारी मध्यरात्री उद्भवलेली ही आपत्कालीन परिस्थिती आणि त्यावर आम्ही ग्रामस्थांनी गांव वाचवण्यासाठी केलेली तत्काळ उपाययोजना हे सारे सरकारच्या रोजगार हमी योजनेत कसे बसवणार असा सवाल या निमीत्ताने रात्रभर धाडसी श्रमदान केलेल्या या सहा शेतक-यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Raigadरायगड